ट्विटर इलॉन मस्क यांच्या ताब्यात आल्यापासून ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. ब्लू टीक वापरणाऱ्यांसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. तर दुकरीकडे आज ट्टिटर वापरकर्त्यांना मस्क यांनी धक्काच दिला. मस्क यांनी थेट ट्विटरचा लोगोच बदलला आहे, आज सकाळी इलॉन मस्क यांनी ट्विट करुन लोगो बदलल्याची माहिती दिली. आजपासून ट्विटरचा लोगो 'ब्लू बर्ड' नसून Doge असणार आहे. हा बदल आजपासून दिसत आहे. तर दुसरीकडे मस्क यांना एका झटक्यात ७५ हजार कोटींचा झटका लागला आहे. पण मस्क यांच्या या निर्णयानं Dogecoin चं नशिब पालटलं असून त्यात एका झटक्यात २० टक्क्यांची वाढ झाली.
इलॉन मस्क यांनी हा बदल केल्यावर डॉजकॉइनच्या किमती थोड्याच वेळात वाढल्या. एका फटत्यात यात २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच त्याची किंमत ०.१० डॉलर्सपेक्षा अधिक झाल्याचं फोर्ब्सनं म्हटलंय. Dogecoin (DOGE) लोकप्रिय डोजी इंटरनेट मीमवर आधारित आहे. दरम्यान, मस्क यांनी सोशल मीडियावर अनेक ट्वीट पोस्ट केलं होते, ज्यात त्यांनी Dogecoin आपलं आवडतं असल्याचं म्हटलं होतं.
ट्विटरवर‘ब्लू बर्ड’च्या जागी दिसू लागला ‘Doge’, तिकडे इलॉन मस्कचे बुडाले ७५ हजार कोटी रुपये, असा झाला गेम
ब्लू बर्डच्या जागी Doge
इलॉन मस्क यांनी ट्विटरवरील आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue-bird) काढून त्याजागी Doge चा फोटो लावला. ट्विटरचा हा लोगो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. दरम्यान, हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर दिसून येत आहे. तसंच युझर्सच्या ट्विटर मोबाईल ॲपवर मात्र ब्लू बर्डच दिसत आहे.
इलॉन मस्क यांनी २६ मार्च २०२२ चा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यात त्यांचं आणि एक निनावी खात्यातील व्यक्ती यांच्यात संभाषण झालं होतं. यामध्ये ब्लू बर्ड लोगो ‘डोज’मध्ये बदलण्याची मागणी करण्यात आली होती. हाच स्क्रीनशॉट शेअर करत मस्क यांनी ‘आश्वासन दिल्याप्रमाणे’ असं म्हटलं आहे.