Join us  

Twitter चा नवा लोगो X लाँच होता मस्क यांनी डिझायनरला नोकरीवरून काढलं! पण आहे थोडा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:59 AM

इलॉन मस्क यांनी ट्विटरचं नाव आणि लोगो दोन्ही बदलले आहेत. ट्विटर आता X.Com झालंय.

इलॉन मस्क यांनी ट्विटरचं नाव आणि लोगो दोन्ही बदलले आहेत. ट्विटर आता X.Com झालंय. त्याचवेळी ट्विटरचा लोगो म्हणून ओळखली जाणारी निळी चिमणीही आता दिसत नाहीये, त्याची जागा आचा X या नव्या लोगोनं घेतलीये. मस्क यांनी काळ्या बॅकग्राऊंडवर पांढऱ्या रंगात X असा नवा लोगो जारी केला. मस्क यांना ट्विटरला एक नवीन रूप, नवी ओळख द्यायची आहे. इलॉन मस्क यांनी त्यांच्या मेगा प्लॅनचा भाग म्हणून ट्विटरचा लोगो बदलला, पण सोशल मीडियावर युझर्सची मात्र प्रतिक्रिया निराळीच होती.

ट्विटरचा लोगो बदलताच युझर्सकडूनही प्रतिक्रियांचा महापूर आला. काहींना हे नवं डिझाइन आवडलं तर काहींच्या पसंतीस ते उतरलं नाही. काही नेटकऱ्यांनी मस्क यांचं कौतुक केलं तर काहींनी त्यांना ट्रोलही केलं. काही लोकांना ट्विटरचा नवा लोगो आवडला नाही. त्याला डिझाइन खूप सामान्य आणि कमी प्रभावी वाटले. अशाच एका ट्विटरने डिझाईनची खिल्ली उडवत लिहिले की, आज मला ट्विटरच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे.@anothercohen नावाच्या ट्विटर युजरने ट्विटरच्या नवीन लोगोची विनोदी पद्धतीने खिल्ली उडवली आहे. अशातच एका व्यक्तीनं आज मला ट्विटरच्या नोकरीवरून काढल्याची मजेशीर प्रतिक्रिया दिली. @anothercohen नावाच्या एका ट्विटर युझरनं मजेशीर पद्धतीनं ट्विटरच्या नव्या लोगोची खिल्ली उडवली.

मला ट्विटरनं नोकरीवरून काढून टाकलंय. मी X या लोगोचा डिझायनिंग इन्चार्ज होतो. अडीच आठवड्यात मी खूप काही शिकलो. आता मला बाहेर कुठे नोकरी मिळतेय का हे पाहायचंय. कोणाला नवा, स्वत:च शिकलेला डिझायनर हवा असेल तर कळवा, असं ट्वीट त्यानं केलंय. यानंतर लोकांनीही मजेशीर रिप्लाय दिले आहेत. ही उडवलेली खिल्ली ट्विटरच्या डिझाइनपेक्षा चांगली असल्याचं म्हणत काहींनी ट्विटरच्या लोगोला ट्रोल केलं.

अनेकांकडून खिल्लीतर काही युझर्सनं ट्विटरच्या ब्लू बर्डचा फोटो शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी ट्विटरचा नवा लोगो सामान्य असल्याचं म्हटलंय. daryl ginn  नवाच्या युझरनं ट्विटरचा जुना लोगो शेअर करत मला कामावरून काढून टाकलं असं म्हणत खिल्ली उडवलीये. मी रिब्रँडचा इन्चार्ज होतो. २४ तासांच्या मेहनतीनंतर हे डिझाइन तयार झालं होतं.

टॅग्स :ट्विटर