Join us

Twitter Takeover: इलॉन मस्क यांच्या ट्विटर खरेदीमागे चीनी कनेक्शन? जेफ बेजोस यांनी उपस्थित केला प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:16 PM

Elon Musk Twitter Takeover: इलॉन मस्क आता ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. या कराराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी या डीलमागे चिनी कनेक्शन शोधले आहे.

Elon Musk Twitter Takeover: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क(Elon Musk) यांनी अखेर ट्विटर विकत घेतले आहे. 44 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 3368 अब्ज रुपयांमध्ये हा करार झाला आहे. दरम्यान, या करारानंतर अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस(Jeff Bezos) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, या करारामागे चीनचा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्विटमधून हीट..या करारावर प्रतिक्रिया देताना बेझोस यांनी न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर माइक फोर्सिथ यांचे ट्विट रिट्विट केले. आपल्या पोस्टमध्ये बेझोस यांनी लिहिले, 'इंटरेस्टिंग प्रश्न! टाउन स्क्वेयरमधून चिन सरकारने काही नफा कमावला आहे का?' बेझोस यांनी या ट्विटमधून मस्क आणि चीनच्या संबंधांकडे बोट दाखवले आहे. खरं तर, मस्कच्या कंपनीसाठी चीन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठ आहे. टेस्लाने चीनमध्ये आपला कारखानाही सुरू केलेला आहे. 

पुढे काय होते ते पाहू: बेझोसया पोस्टच्या मदतीने बेझोस यांनी आपली शंका व्यक्त केली की, टेस्ला आणि ट्विटर या दोन्ही ठिकाणी चीनची भूमिका असेल. जगातील नंबर दोनचे अब्जाधीश म्हणाले, 'या संदर्भात अधिक संभाव्य परिणाम म्हणजे ट्विटरवरील सेन्सॉरशिपऐवजी, चीनमध्ये टेस्लासाठी गुंतागुंत वाढू शकते. पण, माझ्याकडे कदाचित या प्रश्नाचे उत्तर नाही. आता या प्रकरणावर भविष्यात काय होते ते पाहावे लागेल. दरम्यान, बेझोस यांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करत इलॉन मस्कचे कौतुकही केले. बेझोस पुढे लिहितात की, मस्क खूप चांगले आहेत, ते या प्रकरणाची गुंतागुंत अधिक चांगल्या प्रकारे हाताळतील. 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटरअ‍ॅमेझॉन