Join us

ट्विटरचा कारभार येणार एका महिलेच्या हाती; मस्क यांची घोषणा, नाव मात्र गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:45 AM

साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म ट्विटरसाठी इलाॅन मस्क यांनी नव्या सीईओचा शाेध घेतला आहे.

वाॅशिंग्टन : साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म ट्विटरसाठी इलाॅन मस्क यांनी नव्या सीईओचा शाेध घेतला आहे. या पदावर एक महिला विराजमान हाेणार आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घाेषणा केलेली नाही. मात्र, एनबीसी युनिव्हर्सलच्या उच्च विक्री अधिकारी लिंडा याकारिनाे या ट्विटरच्या नव्या सीईओ असू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

इलाॅन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटरसाठी नवा सीईओ नियुक्त करणार असल्याचे सांगितले हाेते. त्यांनीच आत ट्वीट करून ही माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, नवा सीईओ ६ आठवड्यांमध्ये पदभार स्वीकरेल. त्यानंतर मस्क हे ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी असतील. 

कोण आहेत लिंडा याकारिनो

 ५९ वर्षीय लिंडा याकारिनो या एनबीसी युनिव्हर्सल मीडिया एलएलसीमध्ये जागतिक जाहिरात आणि भागीदारी विभागाच्या अध्यक्ष आहेत.

 फाॅर्च्यून, फाेर्ब्ससारख्या मॅगझिनने त्यांना प्रभावशाली महिलांमध्ये स्थान दिले आहे. त्यांनी गेल्या महिन्यात एका जाहिरात परिषदेत मस्क यांची मुलाखत घेतली हाेती. त्यावेळी त्यांनी मस्क यांच्या कार्यपद्धतीचे काैतुक केले हाेते.

टॅग्स :ट्विटर