X Hiring Beta: इलॉन मस्क (elon musk) यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट X (पूर्वी twitter) खरेदी केल्यानंतर यात सातत्याने यात बदल करत आहेत. अलीकडेच त्यांनी X वर कमाईची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यानंतर आता कंपनीने आज एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. इलॉन मस्क त्यांच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मवर नोकऱ्या उपलब्ध करुन देणार आहेत.
Unlock early access to the X Hiring Beta — exclusively for Verified Organizations.
— Hiring (@XHiring) August 25, 2023
Feature your most critical roles and organically reach millions of relevant candidates.
Apply for the Beta today 🚀: https://t.co/viOQ9BUM3Ypic.twitter.com/AYzdBIDjds
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने X हायरिंग बीटाची घोषणा केली आहे. याला व्हेरिफाइड ऑर्गनायझेशन्ससाठी तयार करण्यात आले आहे. याद्वारे कंपन्या ट्विटरवर नोकऱ्यांच्या जाहिराती/माहिती टाकू शकतील. व्हेरिफाइड कंपन्या किंवा संस्था त्या आहेत, ज्यांनी ट्विटरच्या 'व्हेरिफाइड ऑर्गनायझेशन्स'चे सबक्रिप्शन घेतले असेल. याच कंपन्या X हायरिंग बीटा प्रोग्रामसाठी साइनअप करू शकतात.
ट्विटरवर नोकऱ्या उपलब्ध होतील
@XHiring हँडलने ट्विटरवर या कार्यक्रमाबद्दल पोस्ट केले आहे. एक्स हायरिंग म्हणाले- एक्स हायरिंग बीटा वापरण्यासाठी अनलॉक करा, हे व्हेरिफाइड ऑर्गनायझेशन्ससाठी आहे. याच्या मदतीने कंपन्या लाखो लोकांपर्यंत पोहचू शकतील. एकूणच काय तर, ट्विटरने कंपन्यांना व्हॅकन्ट जागेवर भरती करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ट्विटर युजर्सदेखील या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील.
LinkedIn शी स्पर्धा
रिपोर्ट्सनुसार, कंपन्या त्यांच्या प्रोफाइलवर जास्तीत जास्त 5 नोकऱ्या जोडू शकतात. इलॉन मस्क यांनी हे पाऊल LinkedIn सारख्या लोकप्रिय जॉब पोस्टिंग प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी उचलले आहे. आता हा नवीन प्लॅटफॉर्म किती लोकप्रिय ठरतो, हे येणाऱ्या काळात कळेल.