Join us  

ब्लू टिक असलेल्यांना 'ट्विटर'कडून मोठं गिफ्ट, एलॉन मस्कने दिली नवी सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 10:58 PM

केवळ ब्लू टीक असलेल्यांनाच ही सवलत मिळणार आहे. 

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा(Twitter) चा ताबा मिळवल्यानंतर एका मागून एक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यात कर्मचारी कपातीचा निर्णयही होता. तर, काही दिवसांपूर्वीच ट्विटरचा लोगो चिमणी उडवून त्याजागी डॉगी घेतल्याचं जगाने पाहिलं. या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. मात्र, आता ट्विटरने घेतलेल्या निर्णयाने सुखद धक्का सर्वांनाच मिळणार आहे. कारण, यापुढे ट्विटरवर २८० अक्षरांऐवजी तब्बल १० हजार शब्दांत आपल मत मांडता येणार आहे. मात्र, केवळ ब्लू टीक असलेल्यांनाच ही सवलत मिळणार आहे. 

ट्विटरवरुन यापूर्वी ४००० अक्षरांमध्ये (स्ट्रोक) आपलं मत किंवा भूमिका मांडावी लागत होती. मात्र, कंपनीने आता ही अक्षरमर्यादा वाढवून १० हजारांवर नेली आहे. सध्या या सवलतीचा लाभ केवळ अमेरिकेतील युजर्संनाच मिळणार आहे. त्यातही ज्यांच्या अकाऊंटला ब्लू टीक व्हेरीफिकेशन आहे, त्यांनाच याचा लाभ मिळेल. दरम्यान, हळू हळू इतर देशातील युजर्संनाही या नव्या सवलतीचा लाभ मिळेल, पण त्यावेळेस त्यासंदर्भातील माहिती देण्यात येईल. त्यामुळे, सध्या भारतातील ट्विटर युजर्संना या संधीचा लाभ घेता येणार नाही. 

विशेष म्हणजे ब्लू टीकधारक ट्विटर युजर्स केवळ लांबलचक पोस्टच लिहू शकणार नाहीत, तर या पोस्टसाठीचा फॉन्ट आणि स्टाईलही बदलू शकणार आहेत. क्रिएटर्सं युजर्संना लक्षात घेऊनच ट्विटरने या नव्या सुविधा लागू केल्या आहेत. ब्लू टिकधारकांना सबस्क्रिप्शन मॉडेलसाठी अप्लाय करण्यासही ट्विटरने विचारले आहे. त्यामुळे, मॉनिटायजेशन ऑन करण्यात येईल व केवळ सबस्क्राईब असलेल्यांनाच ती पोस्ट किंवा व्हिडिओ पाहता येईल. 

मस्कने केली कर्मचारी कपात

मस्क यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अंदाजे 8,000 ट्विटर कर्मचार्‍यांपैकी केवळ 1,500 कर्मचारी सध्या कंपनीत काम करत आहेत. कंपनी विकत घेतली तेव्हा 8,000 पेक्षा कमी कर्मचारी काम करत होते. इतक्या लोकांना कामावरुन काढणे अवघड काम आहे का? यावर मस्क म्हणाले, ते खूप कठीण आणि वेदनादायक होते. 

 

टॅग्स :ट्विटरएलन रीव्ह मस्क