Join us  

सामान्य व्यक्ती आयुष्यभर कमवू शकत नाही, तितकी आहे टिम कुक यांची सॅलरी, नेटवर्थ पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 1:51 PM

दोन ॲपर्स स्टोअर्सची सुरूवात करण्यासाठी टिम कुक भारतात आले.

Tim Cook Net Worth: देशात ॲपल कंपनीची एकापाठोपाठ एक दोन स्टोअर्स सुरू झाली आहेत. मुंबईत ॲपलचं पहिलं स्टोअर सुरू झाल्यानंतर दुसरं स्टोअर आज दिल्लीत सुरू झाले आहे. दोन्ही स्टोअर्सचं ओपनिंग (Apple Store Launching) कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी केलं. यावेळी दुकानाबाहेर लोकांची मोठी गर्दी दिसून आली. 

दरम्यान, ॲपलचे सीईओ टिम कुक यांची एकूण संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असलेल्या टीम कुक यांचा दिवसाचा पगार ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. टीम कुक यांनी १९९८ मध्ये ॲपल ही कंपनी जॉईन केली. जेव्हा आपली स्टीव्ह जॉब्स यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांच्या एका सांगण्यावरूनच आपण कंपनीत रुजू होण्याचा निर्णय घेतल्याचं टीम कुक यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

किती आहे नेटवर्थ?टीम कुक यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर फोर्ब्सच्या मते ती १.८ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १,४७,५० कोटी रुपये आहे. अब्जाधीश असूनही, टिम कुक हे कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे २,४०० चौरस फुटांच्या घरात राहतो. टिम कुक २०२० मध्येच अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले. आज कुक यांची एकूण संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स (१,४७,५०,०१,००,००० रुपये) आहे. २०२० मध्ये त्यांची एकूण संपत्ती १.५ अब्ज डॉलर्स (१,२२,९१,६७,५०,००० रुपये) होती.

किती मिळते सॅलरी?एका रिपोर्टनुसार, ॲपलनं टिम कुक यांना ३.४ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २७,८६,११,३०० रुपये वेतन म्हणून गेल्या वर्षी दिले होते. कंपनीनं त्यांना २० मिलियन डॉलर्स म्हणजेच १,६३८,८६६,००० रुपये बोनस म्हणून वर्षातून दोनदा दिले. २०११ मध्ये जेव्हा टिम कुक अॅपलचे सीईओ बनले तेव्हा त्यांचा पगार सुमारे ९००,००० डॉलर म्हणजेच ७,३७,५०,०५० रुपये होता. २०२१ मध्ये टीम कुक यांना ७३४ कोटी रुपये वेतन म्हणून मिळाले होते. दरम्यान ॲपल सर्व वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासासाठी कुक यांना खाजगी विमानही पुरवते.

टॅग्स :अॅपलव्यवसाय