Lokmat Money > बिझनेस न्यूज > आरएफएलच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

आरएफएलच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

७२९ कोटींचा घोटाळा। माजी मालकांशी संगनमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 01:54 AM2020-09-27T01:54:27+5:302020-09-27T01:54:59+5:30

७२९ कोटींचा घोटाळा। माजी मालकांशी संगनमत

Two bank officials arrested in RFL scam | आरएफएलच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

आरएफएलच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

नवी दिल्ली : रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेड (आरएफएल) या कंपनीचा सुमारे ७२९ कोटी रुपयांचा निधी अन्यत्र वळविल्याबद्दल तसेच त्याचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने लक्ष्मीविलास बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना शुक्रवारी अटक केली आहे.

प्रदीपकुमार (५७ वर्षे), अंजनीकुमार वर्मा (४८) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यासंदर्भात आर्थिक गुन्हा शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, रेलिगेअर एंटरप्रायजेसचे माजी मालक मालविंदर मोहनसिंग, शिविंदर मोहनसिंग या बंधूंशी लक्ष्मीविलास बँकेच्या या दोन अधिकाºयांनी संगनमत केले होते. आरएफएलच्या मनप्रीतसिंग सुरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.रेलिगेअर एंटरप्रायजेसचे माजी मालक मालविंदर व शिविंदरसिंग यांना गेल्या डिसेंबर महिन्यातच अटक करण्यात आली असून ते आता न्यायालयीन कोठडीत आहेत.

काय आहे प्रकरण?
या तक्रारीत म्हटले आहे की, आरएफएलने नोव्हेंबर २०१६ मध्ये ४०० कोटी रुपयांची मुदतठेव लक्ष्मीविलास बँकेमध्ये ठेवली. या ठेवी अल्पमुदतीच्या होत्या. त्यानंतर आरएफएलने पुन्हा ३५० कोटी रुपयांची मुदतठेव अल्पकाळासाठी याच बँकेत ठेवली. त्यानंतर ३१ जुलै २०१७ ला या बँकेकडून आरएफएलला एक धक्कादायक ई-मेल आला. त्यात म्हटले होते की, या सर्व मुदतठेवींची रक्कम लक्ष्मीविकास बँकेने आरएफएलच्या करंट अकाऊंटमध्ये वळती केली होती. त्यानंतर या बँकेने ७,२३,७१,५०,९२० रुपयांची रक्कम आरएफएलची परवानगी न घेताच काढून दुसरीकडे वळविली.

Web Title: Two bank officials arrested in RFL scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.