Join us

दोन दिवसांत सोने हजार रुपयांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 5:43 AM

आधीच मोठ्या उच्चांकीवर पोहोचलेल्या सोने व चांदीच्या भावात आता पुन्हा अमेरिका व इराणमधील तणावामुळे मोठी भाववाढ झाली आहे.

विजयकुमार सैतवाल जळगाव : आधीच मोठ्या उच्चांकीवर पोहोचलेल्या सोने व चांदीच्या भावात आता पुन्हा अमेरिका व इराणमधील तणावामुळे मोठी भाववाढ झाली आहे. दोनच दिवसांत सोने व चांदीच्या भावात प्रत्येकी एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोने ४0 हजार ६00 रुपये प्रती तोळा तर चांदी ४८ हजार रुपये प्रती किलोवर पोहोचली आहे.अमेरिका व इराणमधील युद्धजन्य स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. १ जानेवारीला सोने ३९ हजार ५00 रुपये होते. २ जानेवारीला १00 रुपयांनी वाढ ते ३९ हजार ६00 रुपये प्रती तोळा झाला. सोने-चांदीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे. अमेरिका, युरोपियन देशांच्या सराफ बाजारावर भारतीय बाजारातील सोन्याचे भाव अवलंबून असतात.मोजावे लागतात ४१ हजारसध्या सोने ४0 हजार ६00 रुपये असले तरी त्यावर तीन टक्के जीएसटी लागत असल्याने सोन्यासाठी प्रती तोळा जवळपास ४१ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सध्या अमेरिकन डॉलरही ७१.७६ रुपयांवर पोहोचल्याने भाववाढीत एकप्रकारे वाढच झाली आहे.>अमेरिका व इराण यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहे. हा तणाव वाढत गेला तर दोन्ही धातूंचे भाव आणखी वाढू शकतात.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ असोसिएशन, जळगाव