खासगी क्षेत्रात नौकरी करणारे लोक बऱ्याचदा संस्था बदलत असतात. यामुळे एकापेक्षा अधिक यूएएन नंबर अॅक्टिव्ह होऊ शकतात. मात्र, नियमा प्रमाणे एका व्यक्तीकडे एका वेळी एकच यूएएन नंबर असणे अपेक्षित आहे. खरे तर, एकाच वेळी एकापेक्षा अधिक यूएएन नंबर अॅक्टिव्ह असणे नियमाविरुद्ध आहे.
अशीच स्थिती आपल्या बाबतीतही निर्माण झाली असेल तर, अर्थात आपलेही दोन UAN नंबर अॅक्टिव्ह असतील तर, फार टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. कारण अशा परिस्थितीत मेंबर्सना ईपीएफ अकाउंट फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. आपण दोन यूएएन नंबर असल्यास कुठलाही एक नंबर डिअॅक्टिव्हेट करू शकता.
जुना यूएएन नंबर डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी ईपीएफ मेंबरला ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतींचा वापर करता येऊ शकतो.
ऑफलाइन पद्धत -
- UAN डिअॅक्टिव्हेट करायचे असल्यास आपण जेथे काम करत असाल त्या संस्थेला सूचना द्यावी लागेल.
- uanepf@epfindia.gov.in वर ईमेल पाठवून EPFO ला कळवू शकता.
- जो UAN डिअॅक्टिव्हेट करायचा आहे, त्यासंदर्भात या मेलमध्ये संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
- मेल पाठवल्यानंतर EPFO कडून व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होते. यानंतर जुना यूएएन नंबर डिअॅक्टिव्हेट होतो.
- मात्र, येथेच सर्व संपत नाही, तर यानंतर आपल्याला PF ट्रान्सफर करण्यासाठी अप्लाय करावे लागेल.
- यानंतर आपला जुन्या PF अकाउंट्समधील फंड नव्या पीएफ अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल.
ऑनलाइन पद्धत -
- सर्वप्रथम https://www.epfindia.gov.in/ वर वन मेंबर वन EPF अकाउंटच्या माध्यमाने जुना PF फंड लेटेस्ट अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी अप्लाय करावे लागेल.
- आता वन मेंबर वन EPF अकाउंटमध्ये नव्या UAN आणि पासवर्डने लॉग इन व्हावे लागेल.
- ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर ऑफ अकाउंटवर क्लिक करावे लागेल.
- आता लिंक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी अप्लाय करावे लागेल.
- आता EPFO आपले डिटेल्स व्हेरिफाय करेल.
- व्हेरिफिकेशननंतर जुना UAN डिअॅक्टिव्हेट होऊन जाईल.
- यासंदर्भात SMS च्या माध्यमाने EPFO मध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सूचना मिळते.
- यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्या पीएफ अकाउंटचा फंड नव्या अर्थात सध्याच्या पीएफ अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता.