Join us  

व्हॉट्सअॅपचे दोन धमाकेदार फीचर्स

By admin | Published: January 12, 2017 4:43 PM

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने दोन नवे फीचर आणले आहेत.आतापर्यंत व्हॉट्सअॅपवरून एकावेळी 10 मीडिया फाईल्स शेअर करता येत होत्या मात्र...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने दोन नवे फीचर आणले आहेत.  व्हॉट्सअॅपने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये GIF सपोर्ट सुरु केलं होतं. नव्या फीचरमुळे GIF इमेज पाठवणं आणि शोधणं सोप्पं होणार आहे.  याशिवाय युजर्सना जास्त मीडिया फाईल्स शेअर करता येणार आहेत. 
 
आतापर्यंत व्हॉट्सअॅपवरून  एकावेळी 10 मीडिया फाईल्स शेअर करता येत होत्या मात्र नव्या फीचरमुळे आता 30 फोटो किंवा अन्य मीडिया फाईल्स शेअर करता येणार आहेत. हे दोन्ही फीचर व्हॉट्सअॅपच्या बिटा व्हर्जन 2.17.6  वर उपलब्ध आहे.  लवकरच ऑफिशियल व्हॉट्सअॅप यूझर्सनाही अपडेटनंतर या फीचरचा अनुभव घेता येणार आहे.
 
आतापर्यंत अॅन्ड्रॉईड वापरणारे जर त्यांच्या फोनमध्ये GIF इमेज सेव असतील तरच त्याचा वापर करू शकत होते. मात्र, आता नव्या फीचरमुळे यूझर्सना इमोजीच्या पर्यायावर क्लिक केल्यावर GIF इमेज मिळतील.