Success Story: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकांनी छोट्या-छोट्या स्टार्टअपमधून मोठा उद्योग उभारला आहे. ChatGPT सारख्या तंत्रज्ञानामुळे अनेकांनी टेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आज आम्ही अशा दोन मित्रांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी ChatGPT चा वापर करुन एक कंपनी सुरू केली आणि अवघ्या 15 हजार रुपयांची गुंतवणुकीवर 1 कोटींची कमाई केली.
ऐकून विश्वासच बसणार नाही, पण ChatGPT मुळेच हे शक्य झाले. Sal Aiello आणि Monica Power, या दोन मित्रांनी ChatGPT च्या मदतीने एक स्टार्टअप तयार केले. यामध्ये त्यांनी फक्त 15 हजार रुपये ($185) गुंतवले. या दोघांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित तंत्रज्ञानाचा असा वापर केला, ज्यामुळे अवघ्या सात महिन्यानंतर एका व्यावसायिकाने त्यांचा स्टार्टअप 1.5 लाख डॉलर्स (सुमारे 1.40 कोटी रुपये) मध्ये विकत घेतला.
4 दिवसात कामाला सुरुवात केली
या दोघांनी सिलिकॉन व्हॅलीतील प्रसिद्ध स्टार्टअप एक्सीलेरेटर Y Combinator च्या मदतीने केवळ 4 दिवसांत त्यांची व्हर्च्युअल स्टार्टअप आयडिया लॉन्च केली. ChatGPT ला योग्य प्रश्न कसे विचारायचे, या समस्येचे निराकरण करण्यासाठी हे स्टार्टअप तयार करण्यात आले. त्यांनी मिळून एक AI-आधारित रिसर्च टूल बनवले, जे युजरला त्यांच्याा आयडिया एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये कनव्हर्ट करुन देतो. सोप्या शब्दात सांगायचे तर, ChatGPT चा योग्य प्रकारे वापर कसा करायचा, हे यात शिकवले जाते.
ही आयडिया उद्योजकांसाठी वरदान ठरली
साल आणि मोनिकाने DimeADozen नावाचे अॅप तयार केले. हे नवीन उद्योजकांच्या आयडिया व्हॅल्यूएट करुन एक रिपोर्ट तयार करते आणि त्याच्या यशाची संपूर्ण ब्लू प्रिंट देते. त्यासाठी फक्त $39 (रु. 3,159) खर्च येतो. याचे रिजल्ट ऑर्गॅनिक रिसर्च एजन्सी आणि सर्च इंजिनपेक्षा अधिक वेगाने येतात.
7 महिन्यांत 55 लाखांची कमाई
DimeADozen ने या दोघांना प्रचंड नफा मिळवून दिला. अवघ्या 7 महिन्यांत या स्टार्टअपने 66 हजार डॉलर्स (सुमारे 55 लाख रुपये) कमाई केली. जर आपण खर्चाबद्दल बोललो तर, यावर एकूण खर्च फक्त 150 डॉलर्स (सुमारे 12 हजार रुपये) वेब डोमेन आणि 35 डॉलर्स (2,835 रुपये) डेटाबेसवर खर्च केले गेले आहेत. याचा अर्थ बहुतांश महसूल केवळ नफ्याच्या रूपातच प्राप्त झाला. यानंतर गेल्या महिन्यात बिझनेस कपल फेलिप अरोसिमेना आणि डॅनियल डी कॉर्नेली यांनी त्यांचे स्टार्टअप $1.50 लाख (रु. 1.40 कोटी) मध्ये विकत घेतले.