- दत्ता थोरे, लातूर डाळींचे गगनाला भिडलेले दर साठेबाजांवरील कारवाईने काहीसे उतरले असले तरी आणखी दोन महिने भाव उच्चांकी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपुऱ्या पावसाने घटलेले उत्पादन व सरकारने साठेबाजांवर उशिरा कारवाई सुरू केल्याने तूरडाळीचा तोरा आणखी दोन महिने मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाही. सामान्यांना दिलासा देण्यासाठी डाळीचे रेशनिंग करण्याशिवाय सरकारला पर्याय नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. वर्षभरात तुरीच्या डाळीचे दर तिप्पट झाले आहेत. तूरच नव्हे, तर मूग, उडीद, चना आणि मसूर डाळीचेही दर ऐन सणासुदीच्या दिवसांत कडाडले. सरकारने साठेबाजांवर फास आवळण्यास सुरुवात केल्याने दर काही प्रमाणात उतरले. तूर २०५ वरून १८५, मूग ११५ वरून १०८, चना ६७ वरून ६४, मसूर ८२ वरून ७८ तर उडीद १७० वरून १४० रुपयांवर आली आहे. देशातील दुष्काळसदृश स्थितीमुळे डाळींच्या उत्पादनाला ‘ब्रेक’ लागल्याने नफेखोरांचे मात्र फावले.आयातीवर भिस्तनवीन मालावर प्रक्रिया होऊन डाळ डिसेंबरचा शेवटचा आठवडा किंवा जानेवारीत बाजारात येईल. आफ्रिकन डाळ भारतात येण्यास महिना लागतो आणि ती गरजेइतकी आयात करणे परवडत नाही, असे डाळींचे उत्पादक नितीन कलंत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दर भडकल्याने दोन महिन्यांपासून ओरडडाळींचे दर भडकल्याने दोन महिन्यांपासून ओरड सुरू झाली. तुरीला २०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाल्याने साठेबाजांनी माल केव्हाच बाहेर काढला. आता कारवाईचे आदेश येत आहेत. ही कारवाई दोन महिने आधीच का केली नाही?- कीर्ती भुतडा, डाळ उत्पादक उत्पादनाकडे दुर्लक्षडाळ उत्पादनाबाबत सरकारचे दुर्लक्ष होत असल्यानेच ही स्थिती उद्भवली. देशाला २३० ते २४० लाख टन डाळीची गरज असते. परंतु दुर्दैवाने देशात डाळींचे उत्पादन १७५ लाख टन होते. साधारणपणे दरवर्षी ३० लाख टन डाळ आयात होते. मात्र त्यानंतरही १५ ते २० लाख टन डाळींचा तुटवडा निर्माण होतो. तरीही डाळींच्या उत्पादनाकडे सरकार गांभीर्याने का पाहत नाही? डाळींच्या नव्या जाती शोधून उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे.- नितीन कलंत्री,व्यापारीकेंद्र सरकारने 2015-16मध्ये २ कोटी टन डाळींचे उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यातील 70लाख टन उत्पादन खरीप हंगामात होणे अपेक्षित आहे; तर उर्वरित रब्बी हंगामात होण्याची शक्यता आहे. मात्र कृषी विभागाने गेल्या महिन्यात वर्तविलेल्या प्राथमिक अंदाजात खरिपातील डाळींचे उत्पादन 55लाख टन होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. उत्पादन वाढीसाठी प्रयत्न गरजेचेडाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी लागवडीपासून प्रयत्न व्हायला हवेत. कमी पाण्यावर येणाऱ्या बियाण्यांचा शोध, सिंचनाच्या विशेष सोयी, हमीभाव आदी धोरणांची अंमलबजावणी केली तर डाळींचे क्षेत्र वाढून स्वयंपूर्ण बनता येईल.
आणखी दोन महिने संकट!
By admin | Published: October 25, 2015 1:57 AM