कोलकाता : देशातील चहा उत्पादन यंदाच्या ऑगस्टमध्ये सुमारे ४ टक्के घटून १७.७९ कोटी किलोवर आले. ऑगस्ट २०२२ मध्ये चहा उत्पादन १८.५४ कोटी किलो झाले होते. चहा बोर्डाच्या आकडेवारीनुसार, उत्तर भारतातील विशेषत: आसाम आणि प. बंगालमधील एकत्रित चहा उत्पादन घटून १५.८० कोटी किलो झाले. ऑगस्ट २०२२ मध्ये ते १७.०९ कोटी किलो होते.
आसामातील चहा उत्पादन १०.९८ कोटी किलोवरून घटून ९.९७ कोटी किलोवर आले. बंगालमधील चहा उत्पादन ५.६१ कोटी किलोवरून घटून ५.३६ कोटी किलोवर आले. दक्षिण भारतातील चहा उत्पादन मात्र वाढून १.९९ कोटी किलोवर पोहोचले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये हा आकडा १.४५ कोटी किलो होता. (वृत्तसंस्था)