नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) २ हजार कोटी रुपयांचे सोने तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. गेल्या दोन वर्षांत या रॅकेटच्या माध्यमातून ७ हजार किलो सोने म्यानमारमार्गे भारतात आणण्यात आले आहे.
म्यानमार सीमेवरून जमीनमार्गे सोने भारतात आणले जात होते. नंतर विमानाद्वारे ते दिल्लीसह देशातील विविध ठिकाणी नेले जायचे. दिल्लीतील विमानतळावरील देशांतर्गत कार्गो टर्मिनलवर १0 किलो सोने जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासातून या
रॅकेटची माहिती समोर आली. गुवाहाटी येथून विमानाने सोन्याच्या चिपा दिल्लीत आणण्यात आल्या. त्यांची किंमत सुमारे ३.१ कोटी रुपये होती.
या तस्करीत विमान कंपन्यांचे कर्मचारी सहभागी आहेत का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी गुवाहाटीतील एक व्यावसायिक
आणि दिल्लीतील त्याचा सहकारी, अशी दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी गुवाहाटी येथून तब्बल ६१७ वेळा सोने दिल्लीत आणले.
गुवाहाटी येथील या व्यापाऱ्यास यापूर्वी सोने तस्करी प्रकरणात अटक झालेली आहे. त्याच्याकडून ३७ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. फेब्रुवारी २0१५ मध्ये त्याला १२ किलो सोन्यासह पकडण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>सर्वात मोठे रॅकेट
दिल्ली विमानतळावर जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या चिपा शुद्ध २४ कॅरेटच्या होत्या.
‘मौल्यवान माल’ असे लेबल लावून सोने विमानातून आणले जात होते. भारतात उघड झालेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे सोने तस्करी रॅकेट आहे.
२ हजार कोटींची सोने तस्करी उघड
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) २ हजार कोटी रुपयांचे सोने तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे.
By admin | Published: September 20, 2016 05:43 AM2016-09-20T05:43:14+5:302016-09-20T05:43:14+5:30