Join us  

९३३० कोटींच्या २ हजारांच्या नोटा अद्यापही परत आल्या नाहीत, तुमच्याकडे आहेत का? अशा घ्या बदलून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 8:58 AM

आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. पण, अजुनही आरबीआयच्या कार्यालयात नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर देशभरातील बँकांत नोटा बदलून घेण्याची मोहिम राबविण्यात आली. आता नोटा बदलून घेण्याची मुदतही संपली आहे, पण अजुनही रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत आता आरबीआयने माहिती दिली आहे. चलनात असलेल्या २,००० रुपयांच्या नोटांपैकी सुमारे ९७.३८% नोटा आतापर्यंत बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत आणि आता लोकांकडे फक्त ९,३३० कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत, असं बँकेने म्हटले आहे. आरबीआयने गेल्या वर्षी १९ मे रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती.

नववर्षात आर्थिक गुड न्यूज! सरकारी तिजोरीत आला १२ टक्के अधिक पैसा; आयटीआर भरणारे करदाते ९% वाढले

२,००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य, जे १९ मे २०२३ रोजी व्यवसायाच्या समाप्तीवेळी ३.५६ लाख कोटी रुपये होते, ते आता २९ डिसेंबर २०२३ रोजी व्यवसायाच्या समाप्तीवेळी ९,३३० कोटी रुपयांवर घसरले आहे," असे आरबीआयने म्हटले आहे.

१९ मे २०२३ रोजी चलनात असलेल्या एकूण २,००० रुपयांच्या नोटांपैकी ९७.३८ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. आरबीआयने सांगितले की, २,००० रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर निविदा आहेत. देशभरातील आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात नोटा बदलून किंवा जमा केल्या जाऊ शकतात. 

याशिवाय, लोक कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून २,००० रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी इंडिया पोस्टद्वारे आरबीआयच्या कोणत्याही कार्यालयात पाठवू शकतात. या नोटा चलनातून काढून घेताना आरबीआयने ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलून देण्यास किंवा बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. नंतर ही मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.

आबीआयच्या १९ कार्यालयात नोटा बदलून मिळतात

८ ऑक्टोबरपासून लोक RBI च्या १९ कार्यालयात  २,००० रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे कामकाजाच्या वेळेत या कार्यालयांमध्ये चांगलीच गर्दी दिसून येते. RBI ची ही कार्यालये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक