Join us

यूएई भारतात गुंतविणार तब्बल ५० अब्ज डॉलर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 11:00 AM

प्राप्त माहितीनुसार, पुढील वर्षाच्या सुरुवातीला यूएई आपल्या गुंतवणूक योजनांची माहिती जाहीर करू शकतो.

नवी दिल्ली : संयुक्त अरब आमिरात (यूएई) भारतात ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहे. भारत हा यूएईचा दुसरा मोठा व्यापारी भागिदार आहे तसेच भारताची अर्थव्यवस्था फारच गतीने वाढत आहे. त्यामुळे या गुंतवणूक प्रस्तावावर यूएई काम करीत आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुढील वर्षाच्या सुरुवातीला यूएई आपल्या गुंतवणूक योजनांची माहिती जाहीर करू शकतो. यंदाच्या जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचे राष्ट्रपती शेख मोहंमद बिन झायद यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अधिक गुंतवणुकीवर विचार सुरू केला आहे, असे समजते.दोन्ही देश मागील १० वर्षांपासून द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर काम करत आहेत. तेलाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणखी मजबूत होतील असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त होत आहे. यामुळे रोजगार वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :भारतव्यवसायनरेंद्र मोदी