Join us  

Aadhaar कार्ड अपडेट करण्यासाठी 'ही' कागदपत्रे आवश्यक, UIDAI कडून लिस्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 9:36 AM

UIDAI : आधार कार्ड जारी करणारी संस्था यूआयडीएआयने याबाबत माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

नवी दिल्ली : यूआयडीएआयने (UIDAI) आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये काहीतरी अपडेट करायचं असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी गरजेची आहे.

बँक खात्यांपासून पासपोर्टपर्यंत सध्या सर्वत्र आधार कार्डचा वापर केला जातो, त्यामुळे चुकीची जन्मतारीख किंवा चुकीचा पत्ता तुम्हाला अडचण निर्माण करू शकतो, त्यामुळे तुमच्या आधार कार्डमध्ये काही गडबड असेल तर ती दुरुस्त करू द्या.आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे वैध असतील, हे स्पष्ट करून यूआयडीएआयने कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे.

UIDAI कडून ट्विटआधार कार्ड जारी करणारी संस्था यूआयडीएआयने याबाबत माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर तुम्ही वापरत असलेली कागदपत्रे तुमच्या नावावर आहेत आणि वैध आहेत, याची खात्री करा.

'ही' कागदपत्रे स्वीकारली जातातयूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, आधार कार्डमध्ये ओळखीच्या पुराव्यासाठी (Proof Of Identity ) ३२ कागदपत्रे स्वीकारली जातात. नातेवाईकांच्या पुराव्यासाठी (Proof Of relationship) १४ कागदपत्रे, जन्म तारखेच्या पुराव्यासाठी (DOB) १५ आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी (Proof of Address (PoA)) ४५ कागदपत्रे स्वीकारली जातात. 

Proof Of Relationship1. मनरेगा जॉब कार्ड2. पेन्शन कार्ड3. पासपोर्ट4. आर्मी कॅन्टीन कार्ड

DOB Documnets1. जन्म प्रमाणपत्र2. पासपोर्ट3. पॅन कार्ड4. मार्क शीट्स5. एसएसएलसी बुक/प्रमाणपत्र

Proof Of Identity (PoI)1. पासपोर्ट2. पॅन कार्ड3. रेशन कार्ड4. मतदार ओळखपत्र5. ड्रायव्हिंग लायसन्स

Proof of Address (PoA)1. पासपोर्ट2. बँक निवेदन3. पासबुक4. रेशन कार्ड5. पोस्ट ऑफिस अकाऊंट स्टेटमेंट6. मतदार ओळखपत्र7. ड्रायव्हिंग लायसन्स8. वीज बिल9. पाणी बिल

टॅग्स :आधार कार्ड