Baal Aadhaar Card Update: UIDAI ने अलीकडेच मुलांच्या आधार कार्डाबाबत म्हणजेच बाल आधारबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. प्राधिकरणाने जारी केलेल्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे.
अलीकडेच, UIDAI ने ट्वीट करून माहिती दिली आहे की 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे अनिवार्य आहे आणि तसे करण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. याशिवाय, प्राधिकरणाने आणखी एका ट्वीटमध्ये सांगितले की बायोमेट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे पालकांनी फॉर्म भरण्यासाठी आणि मुलांचा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देण्याचे प्राधिकरणाने सांगितलेय.
UIDAI ही सरकारी प्राधिकरण आहे जी 12-अंकी आधारचे नियमन करते आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बाल आधार कार्ड जारी करते. विविध कल्याणकारी योजना आणि लाभ मिळवण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे. शिवाय, जन्मापासून मुलांसाठी डिजिटल फोटो ओळख पुरावा म्हणून अनिवार्य आहे.
आधारसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम युआयडीएआयच्या uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
- आधार कार्ड रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा.
- मुलाचं नाव, पालकांचं नाव, पत्ता, फोन क्रमांक अशी आवश्यक असलेली माहिती भरा.
- सर्व माहिती पुन्हा एकदा पडताळा आणि सबमिट करा.
- त्यानंतर अपॉईंटमेंटवर क्लिक करा.
- संबंधितांना आयडी प्रुफ, पत्त्याचा पुरावा, डेट ऑफ बर्थ आणि रेफरन्स नंबरसारख्या कागदपत्रांची आवश्यकता असेल.
- त्यानंतर आधार कर्मचारी पुढील प्रक्रिया पूर्ण करेल आणि तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर देईल.
- ६० दिवसांच्या आत आधार कार्ड तुम्हाला तुमच्या पत्त्यावर मिळून जाईल.