नवी दिल्ली- आधार कार्ड आता सरकारी योजनांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे. आधार कार्डाला सुरक्षित ठेवण्यासाठी बरेच लोक ते लेमिनेशन करतात. जेणेकरून ते खराब होऊ नये. खरं तर आधार कार्ड लॅमिनेशन केल्यानंतर आधारचा क्यूआर कोड काम करणं बंद करतो. त्यामुळे तुमची खासगी माहिती जोरी होण्याची दाट शक्यता असते.युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)नं आधारच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. UIDAIच्या मते प्लॅस्टिक आधार कार्डचा वापर केल्यानं डेटा लीक होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे लोकांनी ऑनलाइन पद्धतीनं डाऊनलोड करून mAadhaarचा वापर करावा, असं आवाहनही आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)नं केलं आहे.UIDAIच्या माहितीनुसार, प्लॅस्टिक किंवा पीवीसी आधार स्मार्ट कार्ड्स गरजेचे नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा क्यूआर कोड काम करणं बंद करतो. अशातच तुम्ही लॅमिनेशन केल्यास क्यूआर कोड काम करणं बंद पडेल. तसेच स्वतःची खासगी माहिती आणि आधार नंबर कोणालाही देऊ नये, असंही UIDAIनं सांगितलं आहे. आधारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्लॅस्टिक आधार कार्ड हे कोणत्याही कामाचं नाही. सामान्य कागदावरील आधार कार्ड किंवा मोबाइल आधार कार्ड ग्राह्य धरण्यात येत असल्याची माहितीही UIDAIचे सीईओ भूषण पांडे यांनी दिली आहे.
सावधान! प्लॅस्टिक आधार कार्ड वापरताय, मग तुमचा डेटा होऊ शकतो चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 3:51 PM