Lokmat Money > बिझनेस न्यूज > Russia-Ukraine Conflict : जगातील श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांना मोठा धक्का! 200 बिलियन डॉलर पेक्षा कमी झाली संपत्ती

Russia-Ukraine Conflict : जगातील श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांना मोठा धक्का! 200 बिलियन डॉलर पेक्षा कमी झाली संपत्ती

Elon Musk Net worth : तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने संकेत देणाऱ्या परिस्थितीमुळे जगभरातील शेअर बाजार मोठ्या घसरणीच्या स्थितीतून जात आहे. त्यामुळे जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीतही घट होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 07:15 PM2022-02-24T19:15:50+5:302022-02-24T19:16:31+5:30

Elon Musk Net worth : तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने संकेत देणाऱ्या परिस्थितीमुळे जगभरातील शेअर बाजार मोठ्या घसरणीच्या स्थितीतून जात आहे. त्यामुळे जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीतही घट होताना दिसत आहे.

ukraine russia crisis elon musk suffered heavy losses due to ukraine crisis less than 200 billion in wealth | Russia-Ukraine Conflict : जगातील श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांना मोठा धक्का! 200 बिलियन डॉलर पेक्षा कमी झाली संपत्ती

Russia-Ukraine Conflict : जगातील श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांना मोठा धक्का! 200 बिलियन डॉलर पेक्षा कमी झाली संपत्ती

नवी दिल्ली : युक्रेनबाबत पूर्व युरोपात सुरू असलेल्या संकटाचा परिणाम आता सर्वत्र होताना दिसत आहे. शेअर बाजारापासून क्रूड ऑईलपर्यंत स्थिती बिकट दिसत आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) देखील यातून सुटू शकलेले नाहीत. तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने संकेत देणाऱ्या परिस्थितीमुळे जगभरातील शेअर बाजार मोठ्या घसरणीच्या स्थितीतून जात आहे. त्यामुळे जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीतही घट होताना दिसत आहे. यामुळे एलन मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी झाली आहे.

विशेष म्हणजे एलन मस्क यांची संपत्ती 300 बिलियन डॉलरच्या पुढे होती. अलीकडे, बुधवारी एलन मस्क यांना 13.3 बिलियन डॉलरचे नुकसान सहन करावे लागले होते. त्यांची एकूण संपत्ती 198.6 बिलियन डॉलरवर असून बऱ्याच दिवसानंतर असे घडले आहे की, कोणत्याही अब्जाधीशाची निव्वळ संपत्ती 200 बिलियन डॉलरपेक्षा जास्त नाही. पण यानंतरही टेस्लाचे सीईओ एलन मस्क अजूनही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारणावर परिणाम होणार आहेत. जगभरातील शेअर बाजारात याचा परिणाम झाला. सलग चौथ्या दिवशी टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे टेस्लाचा शेअर (Tesla Stock) सप्टेंबरनंतरच्या नीचांकी पातळीवर गेला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), या वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून येत आहे, ज्यामुळे एलन मस्क यांना 01 जानेवारीपासून आतापर्यंत 71.7 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला एलन मस्क यांची एकूण संपत्ती 340.4  बिलियन डॉलर होती.

टॉप 5 श्रीमंतांचे मोठे नुकसान
दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्षाचा केवळ एलन मस्क यांनाच शेअर बाजारांच्या घसरणीचा फटका बसत आहे, असे नाही. तर ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना या वर्षी आतापर्यंत 22.9 बिलियन डॉलरचा तोटा झाला आहे. तसेच, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) यांना 22.5 बिलियन डॉलर, चौथ्या क्रमांकावर असलेले बिल गेट्स (Bill Gates) यांना 15.7 बिलियन डॉलर आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या लॅरी पेज (Larry Page) यांना 14.1 बिलियनचे डॉलरचे नुकसान झाले आहे. 
 

Web Title: ukraine russia crisis elon musk suffered heavy losses due to ukraine crisis less than 200 billion in wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.