Ultratech India Cements Deal: भारतातील सिमेंट क्षेत्रात कुमार मंगलम बिर्ला यांचे वर्चस्व आहे. मागील काही काळापासून गौमत अदानी या क्षेत्रात नंबर-1 बनण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी अदानी ग्रुपने गेल्या वर्षभरात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यादेखील विकत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, अदानी ग्रुपच्या अंबुजा सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता 89 मिलियन टन आहे, बिर्ला ग्रुपच्या अल्ट्राटेक सिमेंटची उत्पादन क्षमता सुमारे 152 मिलियन टन आहे. गौतम अदानी सिमेंट उद्योगात नंबर-1 बनण्यासाठी वेगाने पुढे जात आहे, पण त्यांचा मार्ग सोपा नाही. कारण पहिल्या क्रमांकावर असलेला आदित्य बिर्ला आपले स्थान टिकवण्यासाठी वेगाने व्यवसायाचा विस्तार करत आहे.
1885 कोटींचा सौदा ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बिर्ला ग्रुपची अल्ट्राटेक कंपनी, अदानी ग्रुपशी स्पर्धा करण्यासाठी इंडिया सिमेंटचा 23% हिस्सा खरेदी करणार आहे. हा करार सुमारे 1885 कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे. या कराराअंतर्गत, अल्ट्राटेक चेन्नईस्थित इंडिया सिमेंट्सचे 70.6 कोटी शेअर्स 267 रुपये प्रति शेअर दराने खरेदी करेल. ही बातमी मीडियात आल्यानंतर गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली.
शेअर्समध्ये वाढकंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांची उच्चांकी(रु. 11875) पातळी गाठली. दुसरीकडे, इंडिया सिमेंटच्या शेअर्समध्येही सुमारे 14% वाढ नोंदवली गेली. या डीलनंतर आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी इंडिया सिमेंट्समधील दुसरी सर्वात मोठी शेअरहोल्डर बनेल. सध्या कंपनीच्या संस्थापकाकडे 28.5% हिस्सा आहे आणि तो सर्वात मोठा भागधारक राहील. या स्टेकमुळे अल्ट्राटेकला दक्षिण भारतातील प्रमुख सिमेंट उत्पादक कंपन्यांमध्ये मजबूत पकड निर्माण करण्यात मदत होईल.
अदानी ग्रुपकडे अनेक कंपन्यांचा मालकीअदानी ग्रुपने दक्षिण भारतात व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच अदानींच्या अंबुजा सिमेंटने, पन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेडला 1.2 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केले. यापूर्वी 2022 मध्ये अंबुजा आणि ACC सिमेंट्स खरेदी करुन अदानी ग्रुप देशातील दुसरी सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी बनली होती. तेव्हापासून अदानी ग्रुपने अनेक लहान-मोठ्या सिमेंट कंपन्या विकत घेतल्या आहेत.