Lokmat Money > बिझनेस न्यूज > कंपनीवरील धाडीत १०० कोटींचे बेहिशोबी उत्पन्न उघड; प्राप्तिकर विभागाची कारवाई

कंपनीवरील धाडीत १०० कोटींचे बेहिशोबी उत्पन्न उघड; प्राप्तिकर विभागाची कारवाई

एकाचवेळी कोलकात्यातील कंपनीच्या २० ठिकाणी शोध मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 07:40 AM2021-12-07T07:40:49+5:302021-12-07T07:41:14+5:30

एकाचवेळी कोलकात्यातील कंपनीच्या २० ठिकाणी शोध मोहीम

Unaccounted income of Rs 100 crore revealed in company raid; Action of Income Tax Department | कंपनीवरील धाडीत १०० कोटींचे बेहिशोबी उत्पन्न उघड; प्राप्तिकर विभागाची कारवाई

कंपनीवरील धाडीत १०० कोटींचे बेहिशोबी उत्पन्न उघड; प्राप्तिकर विभागाची कारवाई

नवी दिल्ली : कोलकाता येथील एका टीएमटी सळया उत्पादक उद्योग समूहाच्या विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींत १०० कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघडकीस आले आहे.

सीबीडीटीच्या वतीने एक निवेदन जारी करून ही माहिती सोमवारी देण्यात आली. त्यानुसार, १ डिसेंबर रोजी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांतील २० ठिकाणी एकाच वेळी या धाडी टाकण्यात आल्या. उद्योग समूहाचे नाव प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेले नाही. 
निवेदनात म्हटले आहे की, बेहिशेबी व्यवहारांचे कागदोपत्री व डिजिटल स्वरूपातील पुरावे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागले आहेत. मोठ्या रकमांचे रोख व्यवहार, बेहिशेबी रोख खरेदी व विक्री, उत्पादन मुद्दाम कमी दाखविणे या प्रकारांशी संबंधित हे दस्तावेज आहेत. 
या समूहाकडून अनेक शेल कंपन्या चालविण्यात येत होत्या, असे पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणावरून दिसून येत आहे. या कंपन्यांच्या मदतीने समूहाने बनावट व्यवहारांची 

नोंद केल्याचे दिसून येत आहे. या नोंदींतील पैसा अंतिमत: समभाग भांडवल अथवा असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात मूळ खात्यावर जमा करण्यात आला. सीबीडीटीच्या सूत्रांनी सांगितले की, शेल कंपन्यांमार्फत होणाऱ्या व्यवहारांच्या मोडस ऑपरेंडीची कबुली उद्योग समूहातील एका व्यक्तीने दिली आहे. या धाडीत ७५ लाख रुपयांची रोख आणि २.२६ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. काही बँक लॉकर्स प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या कारवाईतून आतापर्यंत १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सीबीडीटीच्या हाती लागली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांची फसवणूक
नाेयडा : बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक बँकांकडून कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी नाेयडामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बँकेचे वरिष्ठ अधिकारी नारायण काेटीयार यांनी हर्ष यादव व इतरांविराेधात तक्रार दाखल करण्यात आली हाेती. आराेपींनी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच इतर कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या बँकांकडून काेट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले हाेते. पाेलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Unaccounted income of Rs 100 crore revealed in company raid; Action of Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.