Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंकल सॅमच्या देशालाही भारतीय दागिन्यांचे आकर्षण; रत्ने आणि दागिन्यांची निर्यात वाढली

अंकल सॅमच्या देशालाही भारतीय दागिन्यांचे आकर्षण; रत्ने आणि दागिन्यांची निर्यात वाढली

भारतात बनविलेल्या दागिन्यांना अमेरिकेत मागणी वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 07:58 AM2021-12-25T07:58:53+5:302021-12-25T07:59:55+5:30

भारतात बनविलेल्या दागिन्यांना अमेरिकेत मागणी वाढत आहे.

uncle sam country is also fascinated by Indian jewellery exports of gems and jewellery increased | अंकल सॅमच्या देशालाही भारतीय दागिन्यांचे आकर्षण; रत्ने आणि दागिन्यांची निर्यात वाढली

अंकल सॅमच्या देशालाही भारतीय दागिन्यांचे आकर्षण; रत्ने आणि दागिन्यांची निर्यात वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारतात बनविलेल्या दागिन्यांना अमेरिकेत मागणी वाढत आहे. चालू आर्थिक वर्षातील निर्यातीचे आकडे याबाबत फार बाेलके आहेत. माैल्यवान रत्ने आणि दागिन्यांची निर्यात माेठ्या प्रमाणावर वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात ४१.६५ अब्ज डाॅलर्सपर्यंत निर्यातीचे लक्ष्य सहजपणे साध्य हाेईल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारतात बनविलेल्या दागिन्यांची संपूर्ण जगाला भुरळ पडली आहे. त्यातही अमेरिकेमध्ये मागणी सर्वाधिक आहे. जेम्स ॲन्ड ज्वेलरी एक्स्पाेर्ट प्रमाेशन काैन्सिलने सांगितले की, यावर्षी भारतातून रत्न आणि दागिन्यांची निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढली आहे. नाेव्हेंबरमध्ये रत्न आणि दागिन्यांची निर्यात ४.२१ टक्क्यांनी घटून १७ हजार ७८५ काेटी रुपये हाेती.

हिऱ्यांची चमक कमी

पाॅलिश आणि कट केलेल्या हिऱ्यांची निर्यात २०.४१ टक्क्यांनी घटली आहे. सध्या हिऱ्यांची बाजारपेठ थाेडी सुस्त आहे. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये मागणीत तेजी दिसून येईल, असा अंदाज आहे. साेन्याच्या दागिन्यांची निर्यात माेठ्या प्रमाणात वाढली आहे. नाेव्हेंबरमध्ये निर्यात ३८.२४ टक्क्यांनी वाढून ५ हजार २८६ काेटींपर्यंत गेली आहे. याशिवाय चांदीच्या दागिन्यांचीही निर्यात २०.४७ टक्क्यांनी वाढून १२ हजार ५५२ काेटींपर्यंत पाेहाेचली.
 

Web Title: uncle sam country is also fascinated by Indian jewellery exports of gems and jewellery increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं