Lokmat Money > बिझनेस न्यूज > सायकॉलॉजी समजून घ्या! चांदीच जास्त कमाई करून देणार, सोन्याचे दिवस 'संपले'...

सायकॉलॉजी समजून घ्या! चांदीच जास्त कमाई करून देणार, सोन्याचे दिवस 'संपले'...

सोन्याचे दर जरा अतीच फुगल्याने गुंतवणूक दारांनी देखील हात आखडते घेतले आहेत. उलट चांदीचे झाले आहे. १० ग्रॅम कुठे आणि १ किलो कुठे... उलटा विचार करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 05:35 PM2023-04-24T17:35:43+5:302023-04-24T17:36:33+5:30

सोन्याचे दर जरा अतीच फुगल्याने गुंतवणूक दारांनी देखील हात आखडते घेतले आहेत. उलट चांदीचे झाले आहे. १० ग्रॅम कुठे आणि १ किलो कुठे... उलटा विचार करा...

Understand the psychology! Silver will give more return than gold, the days of gold are 'over'... investment Tips | सायकॉलॉजी समजून घ्या! चांदीच जास्त कमाई करून देणार, सोन्याचे दिवस 'संपले'...

सायकॉलॉजी समजून घ्या! चांदीच जास्त कमाई करून देणार, सोन्याचे दिवस 'संपले'...

सोन्याच्या किंमतीत गेल्या काही आठवड्यांत मोठी वाढ झाली आहे. सोने ६०-६१ हजारावर पोहोचले आहे. आता सोन्याच्या दरात फारशी वाढ होण्याचे सध्यातरी चान्सेस नाहीएत. परंतू, चांदी तुम्हाला मालामाल बनविण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर जरा अतीच फुगल्याने गुंतवणूक दारांनी देखील हात आखडते घेतले आहेत. यामुळे चांदीच्या दरात भविष्याच मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

सोने खरेदीचा ट्रेंड धक्कादायक! दरवाढीचा मोठा फटका; अक्षय तृतीयेला विक्रीत मोठी घट

दुसरे एक कारण म्हणजे चांदीची इंडस्ट्रीअल मागणी वाढू लागली आहे. सोने आणि चांदीच्या दरात यंदा ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, येत्या काळात सोन्याच्या तुलनेत चांदीचे दर जास्त प्रमाणावर वाढू शकणार आहेत. येत्या ९ ते १२ महिन्यांत चांदीची किंमत ८५ ते ९० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही दरवाढ सध्य़ाच्या किंमतीपेक्षा २० टक्क्यांनी अधिक आहे. 

सोन्या-चांदीच्या किंमतींची तुलना करणारे गुणोत्तर सध्या 80 वर आहे. इतिहासात ते ६५ ते ७५ च्या रेंजमध्ये राहिले आहे. यामुळे चांदीच्या दरात आणखी वाढ होण्यास पोषक वातावरण असल्याचे दिसत आहे, असे विश्लेषकांनी म्हटले आहे. जर सोने-चांदीचे गुणोत्तर बघितले तर चांदीचे मूल्य जास्त होण्याची शक्यता आहे, असे कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी रिसर्चचे कमोडिटी हेड रवींद्र राव यांनी सांगितले. 

एमसीएक्सवर चांदीचे दर MCX वर 85,000-86,000 रुपयांवर जाऊ शकतात. भारत हा जगातील सर्वात मोठा चांदीचा ग्राहक आहे, यामुळे मागणी वाढू शकते. जगभरातील चांदीचा साठा गेल्या चार-पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. यामुळे चांदीची मागणी वाढू शकते. मागणी वाढली की किंमतही वाढणार आहे, असे हिंदुस्तान झिंकचे सीईओ अरुण मिश्रा यांनी म्हटले आहे. चांदीचा वापर 5G तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक वाहने आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये केला जात आहे. यामुळे चांदीची मागणी औद्योगिक क्षेत्रात वाढत राहणार आहे, असे मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजचे नवनीत दमानी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: Understand the psychology! Silver will give more return than gold, the days of gold are 'over'... investment Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.