लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जगभरातील कर्मचारी कपातीच्या वातावरणात भारतात काहीसा दिलासा मिळाला आहे. जानेवारीमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर घसरून ७.१४ टक्के झाला. हा ४ महिन्यांचा नीचांक आहे. आर्थिक निगराणी संस्था ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकाॅनॉमी’ने (सीएमआयई) ही माहिती दिली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये बेरोजगारीचा दर ८.३० टक्के होता. जानेवारी २०२३ मध्ये तो कमी होऊन ७.१४ टक्के झाला. त्यात शहरी बेरोजगारीचा दर ८.५५ टक्के, तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ६.४३ टक्के राहिला.
स्थिती सुधारली, आव्हान कायम- मात्र, आम्हाला अजून दीर्घ प्रवास करावा लागणार आहे. दरवर्षी २ कोटी श्रमिक जोडले जातात. त्यामुळे हे अंतर आणखी दीर्घ होत जाते.