नवी दिल्ली : आर्थिक मंदीची झळ देशातील औद्योगिक क्षेत्राला बसू लागली असून, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारी वाढल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
त्यातही फेब्रुवारीमध्ये ग्रामीण भागांत बेरोजगारी वाढल्याचा उल्लेख यात आहे. जानेवारीत ग्रामीण बेरोजगारीचे प्रमाण ५.९७ टक्के होते. ते फेब्रुवारीत ७.३७ टक्के झाले. शहरात बेकारीचे प्रमाण जानेवारीत ७.६५ वरून ९.७0 टक्के झाल्याचे संस्थेचा अहवाल सांगतो. फेब्रुवारीत बेरोजगारीचा ग्रामीण व शहरी सरासरी दर ७.७८ टक्क्यांवर गेला. चार महिन्यांतील हा उच्चांक आहे. जानेवारीत हा दर ७.१६ टक्के होता. ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, वाहन उद्योग, लघू व मध्यम उद्योग तसेच मालमत्ता क्षेत्रात मंदी आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांनी खर्चात कपात सुरू केली असून, नोकरभरती थांबविली आहे, काहींनी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे, असे अहवालात म्हटले आहे.
फेब्रुवारीत बेरोजगारी वाढल्याचा अहवाल
आर्थिक मंदीची झळ देशातील औद्योगिक क्षेत्राला बसू लागली असून, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारी वाढल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 03:44 AM2020-03-04T03:44:16+5:302020-03-04T03:44:21+5:30