सरकारी बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया, यूको बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांनी आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आजपासून बँकेचे नवीन दर लागू करण्यात येत आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने प्रमुख कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. नवीन दर शुक्रवारपासून लागू झाले आहेत.
बँकेच्या म्हणण्यानुसार, एका वर्षाच्या मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर 7.25 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, त्याचप्रमाणे एक दिवस आणि एका महिन्याच्या कर्जावर कपात केल्यानंतर व्याजदर कमी करून 6.75 टक्के करण्यात आला आहे.
अन्य सरकारी बँक इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी-इंडियन ओव्हरसीज बँक) यांनीही एमसीएलआरमध्ये 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे.
बँकेने कर्जावरील व्याजदर एका वर्षासाठी 7.65 टक्क्यांवरून 7.55 टक्के केले आहेत. हा दर गुरुवारपासून लागू करण्यात आला आहे. यूको बँकेने एमसीएलआरमधील व्याजदर 0.05 टक्क्यांनी कमी केले आहे. त्यानंतर एका वर्षाच्या कर्जावरील दर 7.40 टक्क्यांवरून 7.35 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे. ही कपात इतर सर्व मुदतीच्या कर्जावरही लागू असेल.
आता प्रत्येक महिन्याला EMIवर होणार मोठी बचत, तीन बड्या सरकारी बँकांचं ग्राहकांना गिफ्ट
युनियन बँक ऑफ इंडियाने प्रमुख कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 08:58 AM2020-09-11T08:58:25+5:302020-09-11T08:58:39+5:30