Join us  

Union Budget 2022 For Electric Vehicles: शहरांत चार्जिंग स्टेशन नाही, बॅटरी स्वॅपिंग असेल; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 11:56 AM

Union Budget 2022 For Electric Vehicles, Auto Sector: देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी आहे. परंतू चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने याकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत नाहीएत.

देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणली जाणार आहे. यामुळे देशात इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचे प्रमाण वाढणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. 

देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी आहे. परंतू चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने याकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत नाहीएत. शहरांमध्ये जागा अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारू शकत नाही. यामुळे शहरांसाठी बॅटरी स्वॅपिंग योजना आणली जाणार आहे. 

छोटे आणि लघू उद्योग मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या उद्योगांसाठी २ लाख कोटी रुपयांची मदत केली जाईल. डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन दिले जाईल. इझी ऑफ डुईंग बिझनेस 2.0 लाँच. पोस्टाला बँकेशी जोडले जाईल. एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पुढील ३ वर्षात भारतात ४०० हून अधिक वंदे भारत ट्रेन बनवण्यात येतील. तसेच पंतप्रधान गती शक्ती १०० कार्गो टर्मिनल्स उभारले जाणार आहेत. अर्बन ट्रान्सपोर्टला रेल्वेशी जोडलं जाणार आहे. २०२३ पर्यंत रेल्वे नेटवर्क २०० किमी वाढवण्यात येईल. वन स्टेशन वन प्रोडक्ट अंतर्गत लहान शेतकरी आणि लघु उद्योजकांसाठी नवीन उत्पादनं आणि कार्यक्षम लॉजिस्टिक विकसित करणार आहे असं त्यांनी सांगितले.(

टॅग्स :अर्थसंकल्प 2022निर्मला सीतारामनइलेक्ट्रिक कार / स्कूटर