ऑटो सेक्टरला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठा दिलासा दिला आहे. गाड्या विकल्यानंतर त्या देशात कुठूनही रजिस्टर करता येणार आहेत. या गाड्या रजिस्टर करण्यासाठी एक पोर्टल लाँच केले जाणार आहे. यामुळे देशात कुठेही गाडी चालविण्यासाठीच्या भारत श्रेणीनंतरचा हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
याचा फायदा वाहन कंपन्या आणि वाहन मालकांना होणार आहे. कारण सर्वच कंपन्यांचे शोरुम प्रत्येक जिल्ह्यात, आरटीओ क्षेत्रात नसतात. यामुळे एका जिल्हयात गाडी खरेदी करून ती वाहन मालकाच्या दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन रजिस्टर करावी लागते. तसेच राज्या राज्यांचे आरटीओ रजिस्ट्रेशनही वेगवेगळे आहे. यामुळे वाहन मालकांना नाहक त्रास होतो. आता मुंबई, पुण्यात राहणारा व्यक्ती त्याच्याकडील कागदपत्रांवर गावचा पत्ता असेल तरी देखील या शहरांतून गाडी रजिस्टर करू शकणार आहे. त्यासाठी त्याला शहरातून टेम्पररी पासिंगवर गाडी गावच्या आरटीओकडे घेऊन जाण्याची गरज राहणार नाही.
शहरातील ईव्ही प्लॅनिंगसाठी सेंटर फॉर एक्सलंस तयार केले जातील. 7 मोबिलिटी झोन बनविले जातील. 9 फॉसील फ्युअल असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये ईव्हीला प्रोत्साहन दिले जाईल. चार्जिंग स्टेशन वाढविले जातील, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.