नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (मंगळवार) 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार काय घोषणा करते, याची उत्सुकता सर्वांना होती. या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमके काय आहे, हे मुद्दे थोडक्यात जाणून घ्या...
- कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी नाबार्डच्या माध्यमातून तरुणाना आर्थिक मदत करणार
- जलसिंचन योजनेतून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणणार
- सेंद्रीय शेती, आधुनिकता, बजेट फार्मिगसाठी कार्यान्वित करणार
- तेलबियांच्या शेतीला मोठे प्राधान्य देणार
- रबी, खरीब पिकांची खरेदी वाढणार
- राज्य सरकारांनी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश असेल
- नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासह आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला जाणार
- जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद
States will be encouraged to revise syllabi of agricultural universities to meet needs of natural, zero-budget & organic farming, modern-day agriculture: FM Nirmala Sitharaman #Budget2022pic.twitter.com/sq9BG5tkU0
— ANI (@ANI) February 1, 2022
- गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल
- गंगा नदीच्या पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना
- शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचं सहकार्य घेतलं जाईल
- केंद्र सरकारकडून गहू आणि धानाची विक्रमी खरेदी केली जाणार आहे. किमान आधारभूत किमतीद्वारे विक्रमी खरेदी केली जाणार
- गंगा कॉरिडॉरच्या आसपास नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल
- तंत्रज्ञानाचा वापर शेतीतही केला जाणार आहे. यासाठी 'किसान ड्रोन'चा वापर केला जाईल. यामुळे पीक मूल्यांकन, जमिनीच्या नोंदी, कीटकनाशकांची फवारणी केली जाईल.
- 2021-22 मध्ये रब्बी हंगाम आणि खरिपाच्या हंगामामध्ये भात आणि गव्हाची खरेदी 1208 मेट्रिक टन एवढी झाली.
- 1 कोटी 63 लाख शेतकऱ्यांकडून ही धान्य खरेदी करण्यात आली. त्याच्या मोबदल्यामध्ये 2 कोटी 37 लाख कोटी रुपये एमएसपीच्या आधारावरील डायरेक्ट पेमेंट सरकारकडून देण्यात आले.