नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (मंगळवार) 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार काय घोषणा करते, याची उत्सुकता सर्वांना होती. या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमके काय आहे, हे मुद्दे थोडक्यात जाणून घ्या...
- कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी नाबार्डच्या माध्यमातून तरुणाना आर्थिक मदत करणार- जलसिंचन योजनेतून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणणार- सेंद्रीय शेती, आधुनिकता, बजेट फार्मिगसाठी कार्यान्वित करणार- तेलबियांच्या शेतीला मोठे प्राधान्य देणार- रबी, खरीब पिकांची खरेदी वाढणार- राज्य सरकारांनी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश असेल- नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासह आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला जाणार- जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद