Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Union Budget 2022: यंदाचा अर्थसंकल्प तुमच्या मोबाईलवर वाचता येणार; केंद्राचे हे अ‍ॅप डाऊनलोड करा...

Union Budget 2022: यंदाचा अर्थसंकल्प तुमच्या मोबाईलवर वाचता येणार; केंद्राचे हे अ‍ॅप डाऊनलोड करा...

Union Budget 2022 Live Online: कोरोना संकटामुळे यंदाही हे बजेट पेपरलेस असणार आहे. हे बजेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरही वाचू, पाहू शकणार आहात. यासाठी केंद्र सरकारने एक अ‍ॅप उपलब्ध केले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:01 AM2022-02-01T09:01:06+5:302022-02-01T09:01:47+5:30

Union Budget 2022 Live Online: कोरोना संकटामुळे यंदाही हे बजेट पेपरलेस असणार आहे. हे बजेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरही वाचू, पाहू शकणार आहात. यासाठी केंद्र सरकारने एक अ‍ॅप उपलब्ध केले आहे. 

Union Budget 2022: This year's budget can be read on your mobile; Union Budget App Download | Union Budget 2022: यंदाचा अर्थसंकल्प तुमच्या मोबाईलवर वाचता येणार; केंद्राचे हे अ‍ॅप डाऊनलोड करा...

Union Budget 2022: यंदाचा अर्थसंकल्प तुमच्या मोबाईलवर वाचता येणार; केंद्राचे हे अ‍ॅप डाऊनलोड करा...

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज त्यांच्या कारकीर्दीतील चौथे आणि कोरोना संकटानंतरचे सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडणार आहेत. कोरोना संकटामुळे यंदाही हे बजेट पेपरलेस असणार आहे. कोरोना संकटामुळे लोक यंदा अर्थसंकल्पातून आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात काही महत्वाच्या घोषणा करण्याची अपेक्षा ठेवून आहेत. हे बजेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरही वाचू, पाहू शकणार आहात. यासाठी केंद्र सरकारने एक अ‍ॅप उपलब्ध केले आहे. 

यंदाचा अर्थसंकल्प तुम्हाला केंद्रीय बजेट मोबाईल अ‍ॅपवर दिसणार आहे. खासदार आणि सामान्य नागरिक याद्वारे Union Budget 2022 ची कागदपत्रे पाहू शकणार आहेत. हे अॅप गेल्यावर्षी लाँच करण्यात आले होते. (Union Budget App Download)

या वर्षाचे बजेट संसदेत सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाइल अ‍ॅपवर ते उपलब्ध होईल. या मोबाइल अ‍ॅपमध्ये बजेट भाषण, वार्षिक वित्तीय विवरण, वित्त विधेयक आदि उपलब्ध केले जाणार आहे. 

कसे डाऊनलोड करणार....
हे अ‍ॅप केंद्रीय बजेट पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून डाऊनलोड करता येणार आहे. मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. हे अ‍ॅप अँड्रॉ़ईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता.

https://www.indiabudget.gov.in/downloadapp.php

हे मोबाइल अ‍ॅप दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे एक इंग्रजी आणि दुसरी हिंदी आहे.

Web Title: Union Budget 2022: This year's budget can be read on your mobile; Union Budget App Download

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.