देशाच्या अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळाले याची प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यातूनच अर्थसंकल्पातील तरतुदी, प्राप्तिकरातील सवलत, कर्जस्वस्ताई, खिशावर पडणारा भार आदि मुद्द्यांवर चर्चा होते. या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प आपल्या हाती काय देऊन गेला, हेच मांडण्याचा प्रयत्न यावर्षी आम्ही केला आहे. तेही साध्या, सोप्या स्पष्ट शब्दांमध्ये.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळे २ महिन्यांत दूर होणार.
- मुंबई, दादर आणि नागपूर या स्थानकांचे सौंदर्यीकरण होणार.
- मालवाहतुकीसाठी वेगळा मार्ग
मुंबईहून कानपूर येथे मालवाहतूक करण्यासाठी वेगळा रेल्वेमार्ग करण्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथून हा रेल्वेमार्ग जाणार आहे.
दोन नदीजोड प्रकल्पांना मान्यता
मुंबईसह महाराष्ट्राचा मोठा फायदा होणार असलेल्या महाराष्ट्रातील दमणगंगा-पिंजाळ आणि पार-तापी-नर्मदा या दोन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.
Union Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळाले?
Union Budget 2022: देशाच्या अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळाले याची प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यातूनच अर्थसंकल्पातील तरतुदी, प्राप्तिकरातील सवलत, कर्जस्वस्ताई, खिशावर पडणारा भार आदि मुद्द्यांवर चर्चा होते.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:12 AM2022-02-02T07:12:43+5:302022-02-02T07:13:12+5:30