Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Union Budget 2023-24: मोदी सरकारचा भारतीय रेल्वेला मोठा बुस्टर डोस; खासगी भागीदारीसाठी प्रयत्न, ७५ हजार कोटी देणार!

Union Budget 2023-24: मोदी सरकारचा भारतीय रेल्वेला मोठा बुस्टर डोस; खासगी भागीदारीसाठी प्रयत्न, ७५ हजार कोटी देणार!

Union Budget 2023-24: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रेल्वेसाठीच्या बजेटमध्ये बंपर निधीची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 12:26 PM2023-02-01T12:26:10+5:302023-02-01T12:27:25+5:30

Union Budget 2023-24: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रेल्वेसाठीच्या बजेटमध्ये बंपर निधीची घोषणा केली.

union budget 2023 fm nirmala sitharaman said capital outlay of rs 2 40 lakh cr for indian railways in next financial year | Union Budget 2023-24: मोदी सरकारचा भारतीय रेल्वेला मोठा बुस्टर डोस; खासगी भागीदारीसाठी प्रयत्न, ७५ हजार कोटी देणार!

Union Budget 2023-24: मोदी सरकारचा भारतीय रेल्वेला मोठा बुस्टर डोस; खासगी भागीदारीसाठी प्रयत्न, ७५ हजार कोटी देणार!

Union Budget 2023-24: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा पूर्णवेळ असलेला शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. शेती, पायाभूत सुविधा, रस्ते, शिक्षण, लघु-उद्योग, पर्यावरणपूरक विकास, ग्रामीण भागांचा विकास यांसारख्या अनेक गोष्टींसाठी केंद्र सरकार काम करत असून, सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवले असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी भरीव निधीची तरतूद केल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. 

सन २०१३ च्या तुलनेत भारतीय रेल्वेला केंद्र सरकारने ९ पट अधिक मदत, निधी दिल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. तसेच रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास आणखी गतीने व्हावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असणार आहे. रेल्वेच्या विविध योजनांसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच भारतीय रेल्वेत खासगी क्षेत्रातील भागीदारी, गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असेल, असे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले.

पुढील वर्षात रेल्वेसाठी २.४० लाख कोटींची तरतूद

भारतीय रेल्वेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात बंपर निधीची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षात रेल्वेसाठी २.४० लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेचे नवे मार्ग, नव्या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या १०० महत्त्वाच्या योजना प्राधान्याने राबवल्या जाणार असून, रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यावर भर दिला जाणार असून, रेल्वेसाठी डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: union budget 2023 fm nirmala sitharaman said capital outlay of rs 2 40 lakh cr for indian railways in next financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.