Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना थोडा दिलासा देणाऱ्या काही घोषणाही केल्या. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
सीनिअर सिटीझन अकाऊंट स्कीमची मर्यादा साडेचार लाखांवरून वाढवून ९ लाख रुपये करण्यात आली आहे. याचाच अर्थ ज्येष्ठ नागरिक या स्कीममध्ये कमाल ४.५ लाखांऐवजी ९ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात. याशिवाय संयुक्त खात्यात कमाल रक्कम जमा करण्याची मर्यादा वाढवून ती १५ लाख रुपये करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
करदात्यांना दिलासाप्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या रिबेटची मर्यादा आधीच्या ५ लाख रुपयांवरून ७ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी कररचनेमध्येही फेरबदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ही सात लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर नवी कररचना ही पुढील प्रमाणे आहे.
नवी कररचना पुढील प्रमाणे० ते ३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न ० टक्के कर ३ ते ६ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न ५ टक्के कर ६ ते १० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न १० टक्के कर ९ ते १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न १५ टक्के कर १२ ते १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न २० टक्के कर १५ लाख रुपय़ांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येणार आहे.