Join us

Union Budget 2023 : भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे चमकता तारा, निर्मला सीतारामन यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 11:29 AM

Union Budget 2023 : जगभरात भारताचं वर्चस्वही वाढल्याचं निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य.

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे चमकता तारा असल्याचं जगभरानं मानलं असल्याचं म्हटलं. जगभरात भारताचं वर्चस्वही वाढल्याचं त्या म्हणाल्या.

“भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालत आहे. कोणतीही व्यक्ती उपाशी पोटी झोपू नये याची खात्री करोनाकाळात करण्यात आली. सरकारनं २ लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्न पुरवलं. २८ महिन्यांसाठी ८० कोटी लोकांना मोफत धान्याची व्यवस्था करण्यात आली,” अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. “२०१४ पासूनच सरकारच्या प्रयत्नांनी सर्व नागरिकांचं जीवन उत्तम गुणवत्तापूर्ण केलं आहे. प्रति व्यक्ती उत्पन्न दुपटीनं वाढून १.९७ लाख रूपये झालंय. या ९ वर्षांच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आली आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अंदाजे ७ टक्के आहे, जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.  

 

टॅग्स :अर्थसंकल्प 2023निर्मला सीतारामनसरकार