Join us

Budget 2023: महिलांसाठी नवी योजना, २ वर्षांसाठी २ लाखांचं बचतपत्र घेऊ शकणार, व्याजही भरमसाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 11:41 AM

देशातील करोडो महिलांना अर्थमंत्र्यांनी दिली खुशखबर

Budget 2023, Women Empowerment: भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सादर करत आहेत. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अमृतकालचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत उज्ज्वल भविष्याकडे जात असल्याचे त्या म्हणाल्या. जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे, असेही त्या म्हणाल्या. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारताचा हा अर्थसंकल्प अशा वेळी सादर होणार आहे जेव्हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत आणि संभाव्य मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जगाच्या नजरा मोदी सरकारच्या बजेटकडे लागल्या. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी विशेष घोषणा केल्या. देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने नवीन योजना आखली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा

अमृत ​​काल दरम्यान महिलांसाठी नवीन बचत योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दोन वर्षांसाठी घेता येईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. दोन वर्षांचा हा कालावधी मार्च २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत महिला २ लाख रुपयांपर्यंतची महिला सन्मान बचत पत्रे खरेदी करू शकतात. यावर वार्षिक ७.५ टक्के दराने व्याज दिले जाईल. गरज भासल्यास हे पैसे अंशतः काढताही (partial withdrawal) येतील. महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू होणार आहे.

तसेच, ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा देण्यात आला आहे. आणि आत्मनिर्भर भारत योजनेचाही मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात येणार आहे.

मोदी सरकारचा दुसरा टर्म हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारताचा हा अर्थसंकल्प अशा वेळी सादर होणार आहे जेव्हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत आणि संभाव्य मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दुसरीकडे, सरकारने संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात विकास दर 6-6.8% अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत भारताची जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून गणली जात आहे.

टॅग्स :अर्थसंकल्प 2023निर्मला सीतारामन