23 Jul, 24 12:36 PM
पर्सनल टॅक्समध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा
पर्सनल टॅक्समध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरून ७५ हजार रुपये करण्यात आल. याशिवाय ० ते ३ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही, तर ३ ते ७ लाखांपर्यंत ५ टक्के कर लागेल. याशिवाय ७ ते १० लाख रुपयांवर १० टक्के, १० ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के आयकर, तर १२ ते १५ लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के आणि १५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जाईल.
23 Jul, 24 12:28 PM
स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांवर
नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांवर, अर्थमंत्र्यांचा करदात्यांना दिलासा
23 Jul, 24 12:26 PM
F&O वर एसटीटीचे दर वाढवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली
F&O वर एसटीटीचे दर वाढवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यावर आता ०.०२ टक्क्यांची वाढ करण्यात आली.
23 Jul, 24 12:24 PM
सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय
सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. यावरील कस्टम ड्युटी ६.५ टक्क्यांवरून ६.४ टक्के करण्यात आल्याचं सीतारामन म्हणाल्या.
23 Jul, 24 12:23 PM
एन्जेल टॅक्स बंद करण्याची घोषणा
शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचे दर २० टक्के. काही फायनान्शिअल प्रोडक्टवर एलटीसीजी दर १२.५ टक्के, असतील अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. अनलिस्टेड बॉन्ड्स, डिबेंचर्सवर कॅपिटल गेन टॅक्स लागणार. याशिवाय अर्थमंत्र्यांनी एन्जेल टॅक्स बंद करण्याची घोषणा केली.
23 Jul, 24 12:18 PM
ई कॉमर्सवर टीडीएसचा दर कमी करून ०.१ टक्के
ई कॉमर्सवर टीडीएसचा दर कमी करून ०.१ टक्के करण्यात आल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. याशिवाय काही टेलिकॉम इक्विपेंट्सवर कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे.
23 Jul, 24 12:13 PM
सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय
सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. यावरील BCD १५ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आल्याचं सीतारामन म्हणाल्या.
23 Jul, 24 12:10 PM
मोबाईलच्या पार्ट्सवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांवर
कर्करोगाची ३ औषधं कस्ट ड्युटीच्या बाहेर. देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी कस्टम ड्युटीचे नियम बदलणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मोबाईलच्या पार्ट्सवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांवर आणण्यात आली. याशिवाय २५ क्रिटिकल मिनरल्सवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली.
23 Jul, 24 12:05 PM
एफडीआय, परदेशी गुंतवणूकीचे नियम सोपे केले जाणार
एफडीआय, परदेशी गुंतवणूकीचे नियम सोपे केले जाणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. याशिवाय यावेळी मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजनेची घोषणा करण्यात आली. जहाज, विमानं यांच्या फंडिंगचे नियमही सोपे केले जाणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या.
23 Jul, 24 12:03 PM
रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद
स्पेस इकॉनॉमीसाठी १ हजार कोटी रुपयांचा व्हिसी फंड. याशिवाय रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
23 Jul, 24 11:57 AM
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष योजना
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष योजनांची घोषणा. राजगीर, गया, नालंदा, बनारसमध्ये पर्यटनाला चालना दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
23 Jul, 24 11:53 AM
पीएम ग्राम सडक योजनेचा चौथा टप्पा लाँच होणार
पीएम ग्राम सडक योजनेचा चौथा टप्पा लाँच होणार. बिहार, आसाममध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र मदत करणार. सिंचन प्रकल्पांसाठी ११, ५०० कोटींची आर्थिक मदत केली जाणार.
23 Jul, 24 11:52 AM
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ११.११ लाख कोटी रुपयांच्या कॅपेक्सची तरतूद
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ११.११ लाख कोटी रुपयांच्या कॅपेक्सची तरतूद. इन्फ्रावर जीडीपीच्या ३.४ टक्क्यांइतकी गुंतवणूक करणार. एनटीपीसी, भेल सुपर क्रिटिकल थर्मल प्लांट उभारणार. ८००० मेगावॅटचे थर्मल प्लांट उभारणार. भेल एनटीपीसीच्या जॉईंट व्हेन्चरला मेगा पॉवर प्रोजेक्टसाठी मदतीचा विचार.
23 Jul, 24 11:49 AM
१ कोटी घरांसाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा
एनर्जी ट्रान्झिशनसाठी नवं धोरण आणलं जाणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. १ कोटी घरांसाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा यावेळी करण्यात आली. खासगी क्षेत्रासह एकत्र येऊन छोटे न्यूक्लिअर प्लांट तयार केले जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
23 Jul, 24 11:46 AM
शहरांच्या रिडेव्हलमेंटसाठीसाठी लवकर फ्रेमवर्क तयार केले जाणार
रेंटल हाऊसिंगला चालना देणार. रेग्युलेशनसाठी नवे नियम तयार केले जाणार. शहरांच्या रिडेव्हलमेंटसाठीसाठी लवकर फ्रेमवर्क तयार केले जाणार. अर्बन हाऊंसिंग प्लानसाठी १० लाख कोटींची तरतूद. स्टँप ड्युटी कमी करणाऱ्या राज्यांना प्राधान्य देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा.
23 Jul, 24 11:39 AM
सरकारची ऑफशोअर मायनिंग ब्लॉकचा लिलाव करण्याची योजना
सरकारची ऑफशोअर मायनिंग ब्लॉकचा लिलाव करण्याची योजना असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी क्रिटकल मिनरल योजनेची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत पदेशात संपत्तींची खरेदी केली जाणार.
23 Jul, 24 11:42 AM
डेट रिकव्हरीसाठी आणखी ट्रिब्यूनल सुरू करण्यात येणार
डेट रिकव्हरीसाठी आणखी ट्रिब्यूनल सुरू करण्यात येणार आहेत. IBC अंतर्गत आणखी एनसीएलटी सुरू केली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिल
23 Jul, 24 11:39 AM
१०० शहरांमध्ये इंडस्ट्रीयल पार्क विकसित केले जाणार.
१०० शहरांमध्ये इंडस्ट्रीयल पार्क विकसित केले जाणार. इंडस्ट्रिय वर्कर्ससाठी डॉर्मिट्री तयार करणार. ५ वर्षांमध्ये टॉप ५०० कंपन्यांना १ कोटी तरुणांना संधी दिली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
23 Jul, 24 11:37 AM
तरुणांना इंटर्नशिपसाठी व्यापक योजना आणणार
तरुणांना इंटर्नशिपसाठी व्यापक योजना आणण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली. सरकारी बँका अंतर्गत पडताळणीनंतर एमएसएमईला कर्ज देणार. खासगी क्षेत्रासोबच मिळून ई कॉमर्स एक्सपोर्ट हब बनेल असं अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या.
23 Jul, 24 11:35 AM
मुद्रा लोनच्या मर्यादेत वाढ
मुद्रा लोनच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यापूर्वी या योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येत होतं. आता त्यात वाढ करण्यात आली असून त्या अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार.
23 Jul, 24 11:32 AM
एमएसएमईसच्या मदतीसाठी फायनान्सिंग आणि रेग्युलेटरीमध्ये बदल.
एमएसएमईसच्या मदतीसाठी फायनान्सिंग आणि रेग्युलेटरीमध्ये बदल. त्यांच्यासाठी क्रेडिट गॅरंटी स्कीमची गोषणा. क्रेडिट गॅरंटीशिवाय आता लोन मिळणार. क्रेडिट गॅरंटी स्कीम अंतर्गत १०० कोटी रुपयांचं कर्ज.
23 Jul, 24 11:31 AM
पीएम आवास योजनेंतर्गत ३ कोटी नवी घरं बांधणार
पीएम आवास योजनेंतर्गत ३ कोटी नवी घरं बांधणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संसदेत माहिती. पोलावरम प्रोजेक्टसाठी आर्थिक मदतीचीही घोषणा. ग्रामीण विकास इन्फ्रासाठी २.६६ लाख कोटी रुपयांची तरतूद. महिलांशी निगडीत योजांसाठीही ३ लाख कोटी रुपयांची तरतूद.
23 Jul, 24 11:28 AM
२१४०० कोटी रुपयांचे पॉवर प्रोजेक्ट विकसित केले जाणार
२१४०० कोटी रुपयांचे पॉवर प्रोजेक्ट विकसित केले जातील. आंध्र प्रदेशसाठी १५ हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा. बिहारमध्ये नवे मेडिकल कॉलेज आणि एअरपोर्ट्स तयार केले जाणार.
23 Jul, 24 11:26 AM
वर्षाला २५००० विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात ७.५ लाखांचं कर्ज
पंतप्रधान योजनेंतर्गत ३ टप्प्यांमध्ये १५ हजार रुपये दिले जातील. देशातच उच्च शिक्षणासाठी १०लाखांच्या लोन स्कीमची घोषणा. वर्षाला २५००० विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात ७.५ लाखांचं कर्ज मिळणार. तर पूर्वेकडील राज्यांसाठी पूर्वोदय योजनेची घोषणा. यामध्ये बिहार, झारखंड, ओडिशाचाही समावेश. पूर्वेकडील राज्यांच्या एक्स्प्रेस हायवेसाठी २६००० कोटींची तरतूद.
23 Jul, 24 11:22 AM
२० लाख तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जाणार
रोजगार दिल्यास इन्सेटिव्ह मिळणार. सरकार इन्सेटिव्ह देण्यासाठी ३ स्कीम्स आमणार. पंतप्रधान योजनेंतर्गत ३ टप्प्यांमध्ये इन्सेन्टिव्ह दिले जाणार. महिलांसाठी वर्किंग हॉस्टेल तयार करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी दिली. याशिवाय २० लाख तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचंही यावेळी सांगणअयात आलं.
23 Jul, 24 11:19 AM
अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांवर भर
भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. ते म्हणाले की, रोजगार वाढविण्यावर सरकारचा भर आहे. अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांवर भर देण्यात आला आहे. सबका साथ, सबका विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. यावेळी अर्थसंकल्पात तरुणांसाठी २ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
23 Jul, 24 11:18 AM
रोजगार दिल्यावर सरकार इन्सेटिव्ह देणार
कृषी आणि त्याच्या सहाय्यक क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद. रोजगार दिल्यावर सरकार इन्सेटिव्ह देणार असल्याची घोषणा करण्यात आली.
23 Jul, 24 11:16 AM
४०० जिल्ह्यांचा डिजिटल सर्व्हे केला जाणार
आर्थिक वर्ष २५ मध्ये खरीप पिकांसाठी ४०० जिल्ह्यांचा डिजिटल सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
23 Jul, 24 11:15 AM
शेतीसाठी अर्थमंत्र्यांच्या विविध घोषणा
अधिक उत्पादनासाठी वरायटी आणली जाणार. भाज्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर स्कीम आणली जाणार.
23 Jul, 24 11:13 AM
शेती - उत्पादन वाढवण्यासाठी संशोधनावर भर देणार
शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी निरनिराळे उपाय करण्यात येणार. उत्पादन वाढवण्यासाठी संशोधनावर भर देणार. वातावरणाचा प्रभाव कमी होण्यासाठी वरायटी आणली जाणार.
23 Jul, 24 11:11 AM
रोजगारासाठी २ लाख कोटींच्या पॅकेजची अर्थमंत्र्यांची घोषणा
रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५ नव्या स्कीमच्या घोषणा. रोजगारासाठी २ लाख कोटींच्या पॅकेजची अर्थमंत्र्यांची घोषणा. शिक्षण, स्किल्ससाठी १.४८ लाख कोटींची तरतूद.
23 Jul, 24 11:08 AM
सरकारचा फोकस गरीब, महिला, शेतकरी आणि तरूणांवर
भारताचा महागाई दर कमी. ४ टक्क्यांच्या लक्ष्याकडे वाटचाल. सरकारचा फोकस गरीब, महिला, शेतकरी आणि तरूणांवर आहे, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही अधिक भर.
23 Jul, 24 11:07 AM
भारताची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत.
23 Jul, 24 11:03 AM
लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात
लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात. काही मिनिटांतच अर्थसंकल्पाला सुरुवात होणार. प्रेक्षक गॅलरीत परदेशी पाहुण्यांची उपस्थिती.
23 Jul, 24 10:49 AM
अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर होण्यास अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत. अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीये. अर्थमंत्री सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. तत्पूर्वी त्यांनी द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
23 Jul, 24 10:47 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल
अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल. ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प.
23 Jul, 24 10:37 AM
बड्या बँकिंग शेअर्समध्ये वाढीची शक्यता - मॉर्गन स्टॅनली
मॉर्गन स्टॅनलीचे रिद्धाम देसाई यांनी अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देताना मोठ्या खासगी बँकांचे शेअर्स अॅक्टिव्ह दिसत असल्याचं म्हटलं. या शेअर्समध्ये अजूनही वाढीला वाव असल्याचे दिसून येत आहे. एआय थीममुळे आयटी शेअर्समध्ये किंचित तेजी दिसू शकते, असंही ते म्हणाले.
23 Jul, 24 10:32 AM
अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर कसा परिणाम होणार?
"समाजातील प्रत्येक घटकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात, पण जर मी स्वत:ला बाजाराच्या अपेक्षांपुरते मर्यादित ठेवले तर अर्थसंकल्पातील तूट, पब्लिक कॅपिटल एक्सपेंडेचर आणि सोशल एक्सपेंडेचर या तीन गोष्टींवर बाजार लक्ष केंद्रित करेल. या तीन मुख्य गोष्टींवर बाजाराचे लक्ष असणार आहे. आपल्याकडे दीर्घकालीन, स्थिर करप्रणालीची धोरणे आहेत, त्यामुळे आम्ही कॉर्पोरेटमध्ये बदलांची अपेक्षा करत नाही, पण बाजारानुसार कर सवलतीची मर्यादा वाढवली तर त्याचे स्वागतच होईल," अशी प्रतिक्रिया मार्केट एक्स्पर्ट सुनील शहा यांनी एएनआयशी बोलताना दिली.
23 Jul, 24 10:28 AM
संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात
संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत अर्थंसकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल. त्यानंतर अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर ठेवण्यात येईल. ११ वाजता अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करतील.
23 Jul, 24 10:22 AM
जन की बात करतील अशी अपेक्षा - प्रियंका चतुर्वेदी
मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शिवसेनेची (उबाठा) प्रतिक्रिया आली आहे. पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी निशाणा साधला आहे. "मला आशा आहे की निर्मला सीतारामन वाढत्या महागाई आणि बेरोजगारीपासून काही प्रमाणात दिलासा देतील आणि सरकार पंतप्रधानांची 'मन की बात' नव्हे तर 'जन की बात' करतील," असं त्या म्हणाल्या.
23 Jul, 24 10:13 AM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत दाखल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत दाखल. थोड्याच वेळात सादर होणार मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प.
23 Jul, 24 09:45 AM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनात दाखल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपल्या सोबत रेड टॅबलेट घेऊन राष्ट्रपती भवनात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीदेखील आहेत. आज सातव्यांदा निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
23 Jul, 24 09:22 AM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनासाठी रवाना
अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनासाठी रवाना झाल्या आहेत. अर्थमंत्री आपल्या टीमसह हाती लाल रंगाचं बजेट टॅब घेऊन बाहेर पडल्या. सकाळी ११ वाजता त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
23 Jul, 24 09:19 AM
अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात जोरदार उसळी
अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात जोरदार उसळी दिसून आली. शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २२९ अंकांच्या तेजीसह ८०,७३१ अंकांवर उघडला.
23 Jul, 24 09:06 AM
अर्थसंकल्पाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजाराचा मूड?
अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होत असतो. २०१४ मध्ये पहिल्यांदा मोदी सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून आतापर्यंत १२ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात दोन अंतरिम बजेट होते. पहिला अंतरिम अर्थसंकल्प २०१९ मध्ये आणि दुसरा १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर करण्यात आले. यात सातवेळा शेअर बाजार शांततेत होता.
23 Jul, 24 09:01 AM
80C लिमिटमध्ये काही बदल होणार का?
अर्थसंकल्पात 80C मध्येही बदल होण्याची शक्यता आहे. कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांच्या वजावटीचा दावा केला जातो. सरकार पूर्ण बजेटमध्ये ही सवलत वाढवून दोन लाख रुपये करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महागाई वाढली असली तरी गेल्या १० वर्षांत 80C च्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही.
23 Jul, 24 08:57 AM
नव्या कर प्रणालीसाठी कोणते स्लॅब आहेत?
तीन लाखांपर्यंत : कर नाही
३ ते ६ लाख : ३ लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर ५ टक्के
६ ते ९ लाख : ६ लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर १५,००० + १०%
९ ते १२ लाख : ९ लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर ४५,००० + १५%
१२ ते १५ लाख : १२ लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर ९०,००० + २०%
१५ लाखांपेक्षा अधिक : १.५ लाख + १५ लाखांपेक्षा अधिर उत्पन्नावर ३०%
23 Jul, 24 08:52 AM
स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढण्याची शक्यता
अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४ च्या अर्थसंकल्पात करदात्यांना स्टँडर्ड डिडक्शनच्या आघाडीवर मोठी भेट देण्याची घोषणा करू शकतात. सध्या स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५०,००० रुपये आहे. अर्थसंकल्पात ती १००००० रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
23 Jul, 24 08:44 AM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थमंत्रालयात दाखल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थमंत्रालयात दाखल झाल्या आहेत. आज ११ वाजता संसदेत त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. त्या आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
23 Jul, 24 08:42 AM
हा अर्थसंकल्प 'सबका साथ सबका विकास'वर
आज नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी अर्थ राज्यमंत्री आपल्या निवासस्थानाहून रवाना झाले आहेत. "हा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींच्या सबका साथ सबका विकास या मंत्रावर आधारित आहे," असं ते म्हणाले.
23 Jul, 24 08:35 AM
११ वाजता अर्थमंत्री सादर करणार अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या आज सकाळी ११ वाजता संसदेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमन या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत.