Join us

Capital Gains Tax: बजेटनंतर का गडगडला बाजार? ज्याची भीती होती, तीच घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 1:04 PM

Union Budget 2024 Capital Gains Tax: कॅपिटल गेन टॅक्‍सअंतर्गत लॉन्‍ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 2.50 टक्क्यांनी वाढून 12.50 टक्के करण्यात आले आहे. याच बरोबर, काही निवडक मालमत्तांवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) वाढवून 20 टक्के करण्यात आला आहे.

Union Budget 2024 CGT : मोदी सरकार 3.0 च्या बजट 2024 ने शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांना मोठा झटका दिला आहे. कॅपिटल गेन टॅक्‍सअंतर्गत लॉन्‍ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 2.50 टक्क्यांनी वाढून 12.50 टक्के करण्यात आले आहे. याच बरोबर, काही निवडक मालमत्तांवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) वाढवून 20 टक्के करण्यात आला आहे. दरम्यान, बाजारात मोठी घसरण बघायला मिळत आहे.

आता किती लागतो कॅपिटल गेन टॅक्‍स -शेअर बाजारात कॅपिटल गेन टॅक्‍स दोन पद्धतीने लागतो. जर एखादा स्‍टॉक 1 वर्षांच्या आत विकला गेल्यास त्यावर होणाऱ्या नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स लागतो. जो आपल्या टॅक्‍स स्‍लॅबनुसार लावला जातो. तसेच, स्‍टॉक 1 वर्षानंतर विकल्यास, लॉन्‍ग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स लगतो. यात 1 लाख रुपयांपर्यंतचा नफा टॅक्‍सच्या कक्षेत येत नाही. तर याहून अधिक नफ्यावर 10 टक्क्यांप्रमाणे टॅक्स द्यावा लागतो.

बजेट 2024 मध्ये ऑटो सेक्टरसाठी मोठी घोषणा, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार

कॅपिटल गेन टॅक्‍स म्हणजे काय ? - कॅपिटल अथवा भांडवलापासून मिळणाऱ्या नफ्यावर लावल्या जाणाऱ्या टॅक्‍सला कॅपिटल गेन टैक्‍स अथवा भांडवली नफा कर असे म्हटले जाते. हा टॅक्स शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉन्‍ग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स अशा दोन प्रकारचा असतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर 15 टक्के टॅक्स लागतो आणि लॉन्‍ग टर्म कॅपिटल गेनवर 10 टक्के टॅक्स लागतो. 1 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कॅपिटल गेनवर कसल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही.

Budget 2024 Tax Slab: टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल, इतके उत्पन्न असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा, नवीन दर येथे पहा

टॅग्स :अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामनअर्थसंकल्पीय अधिवेशनशेअर बाजारगुंतवणूक