Join us

रस्ते, सिंचन, मेट्रो आदींसाठी महाराष्ट्राला निधीचा आधार; विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांसाठी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 6:10 AM

पुण्यातील मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी ६९० कोटी रुपयांची भरघोस तरतूद; महाराष्ट्र सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान योजनेसाठी ५९८ कोटी रुपये 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राला मंगळवारच्या अर्थसंकल्पात ठेंगा मिळाल्याची टीका होत असताना कोणकोणत्या विकासकामांसाठी निधी महाराष्ट्राला मिळाला याची यादी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत जाहीर केली. आणखीही निधी मिळालेला आहे, अर्थसंकल्पातील तरतुदींचा अभ्यास करून मी त्याबद्दल माहिती देईन, असे ते म्हणाले.

विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. विविध राज्यांमधील मागासलेल्या भागांमध्ये सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठीची ही योजना आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी ४०० कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. या योजनेत ६० टक्के निधी राज्य सरकार तर ४० टक्के निधी केंद्र सरकार खर्च करते. या ४० टक्के निधीतील हिस्सा म्हणून हे ४०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या या कॉरिडॉरच्या कामासाठी ४९९ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. बंगळुरू-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ४६६ कोटी रुपयांची तरतूद आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील नाग नदीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प सोडला आहे. त्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी ५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

मुंबई, पुणे मेट्रो प्रकल्पांसाठी २,५८४ कोटींची तरतूद  nमुंबई मेट्रो प्रकल्पासाठी १ हजार ८७ कोटी रुपये या अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. सोबतच नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ६८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. nपुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ८१४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तिन्ही प्रकल्पांसाठी एकूण २ हजार ५८४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. nएमयूटीपी-३ अंतर्गत ९०८ कोटी रुपयांची तरतूद मुंबईसाठी महत्त्वाची आहे. उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढ त्यामुळे होईल.nमुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) पायाभूत सुविधा प्रकल्प हे पर्यावरणपूरक असावेत यासाठी १५० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांसाठी काय?nमहाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये नजीकच्या काळात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात या राज्यांसाठी भरघोस तरतुदी केल्या जातील अशी अपेक्षा होती. nपरंतु, या अर्थसंकल्पात या तिन्ही राज्यांसाठी फारशा थेट तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. असे असले तरी, काही योजनांचा लाभ या तीन राज्यांना होणार आहे. nपूर्वोदय योजना, प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान यांचा लाभ आदिवासीबहुल झारखंडला मिळणार आहे. तर महाराष्ट्र आणि हरियाणा या शेतीशी संबंधित बहुसंख्य लोक असलेल्या राज्यांना शेतीक्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा फायदा होणार आहे.

केंद्र सरकार कशावर किती खर्च करणार?पेन्शन         २,४३,२९६संरक्षण     ४,५४,७७३अनुदानखते         १,६४,०००खाद्य         २,०५,२५०पेट्रोलियम         ११,९२५शेती         १,५१,८५१उद्योग         ४७,५५९पूर्वोत्तर विकास         ५,९००शिक्षण         १,२५,६३८ऊर्जा         ६८,७६९विदेश         २२,१५५आर्थिक         ८६,३३९आरोग्य         ८९,२८७गृह         १,५०,९८३व्याज         ११,६२,९४०    आयटी, दूरसंचार         १,१६,३४२इतर     १,४४,४७७योजना         ६,२९१ग्रामीण विकास         २,६५,८०८विज्ञान विभाग         ३२,७३६सामाजिक कल्याण         ५६,५०१कर प्रशासन         २,०३,५३०राज्यांसाठी         ३,२२,७८७वाहतूक         ५,४४,१२८संघराज्य क्षेत्र         ६८,६६०शहरी विकास         ८२,५७७आरक्षित निधीतून संसाधने         १३,९९०एकूण     ४८,२०,५१२

टॅग्स :अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामनदेवेंद्र फडणवीस