Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Union Budget 2024 : अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार?

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार?

Union Budget 2024 : जुलैमध्ये सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकतं, असं मानलं जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 10:48 AM2024-07-01T10:48:01+5:302024-07-01T10:49:25+5:30

Union Budget 2024 : जुलैमध्ये सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकतं, असं मानलं जात आहे.

Union Budget 2024 Government can take some big decision in the budget will those with income more than 10 lakh get relief | Union Budget 2024 : अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार?

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार?

Union Budget 2024 : जुलैमध्ये सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकतं, असं मानलं जात आहे. १० लाखरुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांसाठी कर प्रणालीत बदल करण्याचा ही सरकार विचार करत असल्याचं म्हटलं जातंय आणि अशी मागणी कामगार वर्गाकडूनही केली जात आहे. तसंही यंदाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात नोकरदार, तरुण, महिला, अल्प व मध्यम उत्पन्न गटांवर भर दिला जाण्याची दाट शक्यता आहे.

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदलाची मागणी

गेल्या दोन आठवड्यांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रमुख औद्योगिक संघटनांच्या लोकांसोबत बैठका घेतल्या आहेत. येत्या काही दिवसांत अर्थमंत्री आणखी काही संघटनांची बैठक घेणार आहेत. आतापर्यंत जिथे शेती, सेवा, हरित ऊर्जा, ऊर्जा, उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित गरजा ठळकपणे मांडण्यात आल्या आहेत आणि करात सवलत देण्याचीही मागणी केली आहे.

त्याचबरोबर नोकरदार वर्गासाठी इन्कम टॅक्स स्लॅब बदलण्याची ही मागणी होत आहे. नोकरदार वर्गावर आयकराचा बोजा खूप जास्त आहे, असा तर्क लावण्यात आला आहे. जुन्या व्यवस्थेतून पाहिले तर १० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर भरावा लागतो.

नव्या करप्रणालीनुसार सात लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर आयकर भरावा लागतो, परंतु येथे सात लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असल्यास सहा ते नऊ लाखांवर १० टक्के आणि नऊ ते १२ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर १५ टक्के आयकर भरावा लागतो. कारण महागाईबरोबर लोकांचा खर्चही वाढला आहे, त्यामुळे लोकांच्या बचतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे १० लाखरुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना आयकरात सूट हवी आहे.

Read in English

Web Title: Union Budget 2024 Government can take some big decision in the budget will those with income more than 10 lakh get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.