Join us  

Income Tax Slab Changes 2024: करदात्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; टॅक्स स्लॅमध्ये महत्त्वाचे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:44 PM

Income Tax Slab Changes 2024: अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शनसोबतच टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत

Union Budget 2024 :करदात्यांना मोठा दिलासा देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली आहे. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५००० रुपये करण्यात आली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. नवीन करप्रणालीमुळे सरकारला सात हजार कोटींचा महसूल बुडणार असून चार कोटी पगारदारांना त्याचा फायदा होणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामन म्हणल्या. स्टँडर्ड डिडक्शनसोबतच टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवीन कर स्लॅब दरात हा बदल झाला आहे. आता १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास ३० टक्के कर लागू होणार आहे. तसेच नवीन कर प्रणालीमध्ये पगारदार कर्मचाऱ्यांना १७५०० रुपयांपर्यंत बचत होईल.

"नवी करप्रणाली स्विकारलेल्या पगारदात्यांसाठी स्टँटर्ड डिडक्शन वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार तो ५० हजारांवरुन ७५ हजार करण्यात आला आहे. त्याचप्रकारे फॅमिली पेन्शनवरील कपात १५ हजारांवरुन २० हजारांवर नेण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ४ कोटी पगारी कर्मचारी आणि निवृत्तीदारांना लाभ मिळेल," असे निर्मला सीतारमन म्हणाल्या. तर दोन तृतीयांश करदात्यांनी नवी कररचा स्विकारली असून, आयटीआर फाईल करण्याची प्रक्रिया आणखी सोपी करणार आहे. तसेच चॅरिटी, टीडीएससाठी एकच कररचना राहील, असेही सीतारमन म्हणाल्या.

नव्या कर प्रणालीमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये बदल

०-३ लाख रुपये- शून्य

३-७ लाख रुपये - ५ टक्के

७-१० लाख रुपये - १० टक्के

१०-१२ लाख - १५ टक्के

१२-१५ लाख रुपये - २० टक्के

१५ लाखांपेक्षा जास्त - ३० टक्के

याआधी कशी होती कर प्रणाली?

०-३ लाख -शून्य

३-६ लाख -५ टक्के

६-९ लाख- १० टक्के

९-१२ लाख- १५ टक्के

१२-१५ लाख- २० टक्के

१५ लाखांच्या वर - ३० टक्के

टॅग्स :अर्थसंकल्प 2024करनिर्मला सीतारामन