रोजगार वाढ आणि कौशल्य विकाससाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. यानुसार पहिल्यांदाच नोकरी मिळणाऱ्या व्यक्तीला एक पगार केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
पहिल्यांदाच नोकरी लागणाऱ्यांना अर्थमंत्री निर्मला सीतारमन (FM Nirmala Sitharaman) यांनी मोठी मदत जाहीर केली आहे. या नोकरदारांना एका महिन्याचा पगार दिला जाणार आहे. हा पगार डीबीटीमार्फत तीन टप्प्यात वितरित केला जाणार आहे. यासाठी ईपीएफओकडे या कर्मचाऱ्याची नोंदणी होणे आवश्यक असणार आहे.
केंद्र सरकार पहिल्या नोकरीसाठी जे वेतन भेट देणार आहे ते अधिकाधिक १५००० रुपये असणार आहे. यासाठी त्या कंपनीने ईपीएफओकडे या कर्मचाऱ्याची नोंदणी करणे गरजेचे असणार आहे. याचाच अर्थ असंघटीत क्षेत्रातील पीएफशी संबंध नसलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार नाही.
या योजनेसाठी १ लाख रुपयांच्या आत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. याचा फायदा २.१० कोटी तरुणांना होणार आहे. रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५ नव्या स्कीमच्या घोषणा. रोजगारासाठी २ लाख कोटींच्या पॅकेजची अर्थमंत्र्यांची घोषणा. शिक्षण, स्किल्ससाठी १.४८ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अमर उजालाने दिली आहे.
तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जाणार
रोजगार दिल्यास इन्सेटिव्ह मिळणार. सरकार इन्सेटिव्ह देण्यासाठी ३ स्कीम्स आमणार. पंतप्रधान योजनेंतर्गत ३ टप्प्यांमध्ये इन्सेन्टिव्ह दिले जाणार. महिलांसाठी वर्किंग हॉस्टेल तयार करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी दिली. याशिवाय २० लाख तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.