Union Budget
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Union Budget 2025 : महिलांसाठी केंद्राचं मोठं गिफ्ट! व्यवसाय सुरू करण्यासाठी २ कोटींपर्यंतची मदत मिळणार

Union Budget 2025 : महिलांसाठी केंद्राचं मोठं गिफ्ट! व्यवसाय सुरू करण्यासाठी २ कोटींपर्यंतची मदत मिळणार

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत, सीतारमण यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:08 IST2025-02-01T13:07:29+5:302025-02-01T13:08:55+5:30

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत, सीतारमण यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Union Budget 2025 Center's big gift for women! Up to Rs 2 crore assistance will be provided to start a business | Union Budget 2025 : महिलांसाठी केंद्राचं मोठं गिफ्ट! व्यवसाय सुरू करण्यासाठी २ कोटींपर्यंतची मदत मिळणार

Union Budget 2025 : महिलांसाठी केंद्राचं मोठं गिफ्ट! व्यवसाय सुरू करण्यासाठी २ कोटींपर्यंतची मदत मिळणार

Union Budget 2025 ( Marathi News ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत, सीतारमण यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. 

देशातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत म्हणून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये गरिबांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून, केंद्र सरकारने पहिल्यांदाच पाच लाख महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत महिला आणि अनुसूचित जाती आणि जमातीमधील  उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

महिलांनी केलेल्या नवीन स्टार्टअप्सना १०,००० कोटी रुपयांचे नवीन योगदान दिले जाईल, अशी मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. 

पोषण योजनेअंतर्गत, कुपोषण दूर करण्यासाठी आणि मुले आणि महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांना पोषण आहार दिला जातो. पोषण योजनेअंतर्गत, पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना, पोषण अभियान, अंगणवाडी सेवा योजना, पंतप्रधान मातृ वंदना योजना आणि किशोरवयीन मुलींसाठी योजनांचा समावेश आहे. नवीन स्टार्टअप्सना १०,००० कोटी रुपयांचे नवीन योगदान दिले जाईल, असंही सीतारमण म्हणाल्या.

Web Title: Union Budget 2025 Center's big gift for women! Up to Rs 2 crore assistance will be provided to start a business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.