01 Feb, 25 06:01 PM
केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले? कोणत्या क्षेत्रात झाली भरीव तरतूद?
महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार आहे. महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सरकारी शाळांमध्ये ५ लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देणे, आयआयटीमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीसंख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल. ऑनलाईन गिग वर्कर्ससाठी ओळखपत्र तयार करून त्यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्त्वाचा असून सुमारे १ कोटी गिगवर्कर्सना पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. हे सर्व निर्णय विद्यार्थी, युवक, समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आले आहेत.
01 Feb, 25 05:19 PM
"हा तर गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार’’, अर्थसंकल्पावर राहुल गांधींची खोचक टीका
राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार आहे. जागतिक अनिश्चिततेच्या वातावणार आपल्यासमोरील आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदलांची आवश्यकता होती. मात्र हे सरकार वैचारिक बाबतीत दिवाळखोर झालं आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला
01 Feb, 25 04:36 PM
टॅक्स ५१ वेळा, टीडीएस २६ वेळा..., निर्मला सीतारमण यांच्या भाषणात कुठला शब्द आला किती वेळा? पाहा
वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वाधिक ५१ वेळा टॅक्स या शब्दाचा उल्लेख केला. तर २६ वेळा टीडीएस/टीसीएस शब्दाचा उल्लेख केला. त्यानंतर २२ वेळा कस्टम आणि टॅक्सपेयर, २१ वेळा भारत, मेडिकल, रिफॉर्म आणि शेतकरी हे शब्द प्रत्येकी २० वेळा, १८ वेळा स्किम, प्रत्येकी १७ वेळा एक्सपोर्ट आणि स्किम, १५ वेळा एमएसएमई या शब्दाचा उल्लेख केला. त्याशिवाय इन्व्हेस्टमेंट, बँक आणि युथ या शब्दांचा प्रत्येकी १३ वेळा, बजेट, स्कील, शिप, इकॉनॉमी, मॅन्युफॅक्चरिंग या शब्दांचा उल्लेख प्रत्येकी ११ वेळा, इन्फ्रास्ट्रक्चर, सस्टेनेबल, इलेक्ट्रॉनिक्स, ईज ऑफ डुईंग बिझनेस या शब्दांचा प्रत्येकी दहा वेळा उल्लेख आला. तर मोदी शब्दाचा उल्लेखही निर्मला सीतारमण यांनी १० वेळा उल्लेख केला.
01 Feb, 25 04:02 PM
"हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा भुलभुलैया : नाना पटोले यांची टीका
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोठमोठे दावे केले, अत्यंत चमकदार अंदाजात सादर करूनही अर्थसंकल्प समाधानकारक झाला नाही, या बजेटने गुंतवणुकदार प्रभावित झाले नाहीत. तसेच शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचीही निराशाच केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि शेतमालाच्या हमीभावाबदद्लही काहीच नाही. केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया व गोलमाल आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
01 Feb, 25 04:02 PM
"लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या...", अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एकनाथ शिंदेंनी मानले आभार!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठीचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असून १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने घराघरात लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
01 Feb, 25 04:01 PM
पगारदारांची बल्लेबल्ले, इन हँड सॅलरीही वाढणार
निर्मला सीतारामण यांनी इमाने इतबारे कर भरणाऱ्या पगारदार वर्गाला एकाच खटक्यात मालामाल होण्याची संधी दिली आहे. अधिक वाचा
01 Feb, 25 02:35 PM
देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प : अजित पवार
केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी, देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
01 Feb, 25 01:37 PM
काय स्वस्त, काय महाग?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग होणार? वाचा एका क्लिकवर
01 Feb, 25 12:29 PM
करामध्ये मोठी सूट, किती कमाईवर किती कर लागणार
अर्थमंत्र्यांनी भाषणादरम्यान स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून वाढवून ७५ हजार करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
० ते ४ लाखांपर्यंत - काहीही कर नाही
४ लाख ते ८ लाखांपर्यंत - ५ टक्के
८ लाख ते १२ लाख - १० टक्के
१२ लाख ते १६ लाख - १५ टक्के
१६ ते २० लाख - २० टक्के
२० लाख ते २४ लाख - २५ टक्के
२४ लाखांच्या वर - ३० टक्के
01 Feb, 25 12:14 PM
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल. १२ लाखांपर्यंत कोणताही कर नाही, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल. १२ लाखांपर्यंत कोणताही कर नाही, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा.
01 Feb, 25 12:08 PM
रेंटल टीडीएसची मर्यादा २.४ लाख कोटींवरून वाढवून ६ लाख कोटी होणार - अर्थमत्री
नवीन इन्कम टॅक्स कायदा सोपा करण्यात येणार आहे. रेंटल टीडीएसची मर्यादा २.४ लाख कोटींवरून वाढवून ६ लाख कोटी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना टीडीएसची मर्यादा १ लाखांवर करण्यात आली. रिटर्न न भरणाऱ्यांसाठी मर्यादा ४ वर्षांपर्यंत वाढवली.
01 Feb, 25 12:00 PM
टीव्हीचे देशांतर्गत तयार होणारे पार्ट्स स्वस्त होणार - अर्थमंत्री
टीव्हीचे देशांतर्गत तयार होणारे पार्ट्स स्वस्त होणार. तर दुसरीकडे प्लॅट डिस्प्ले पॅनलवरील कर १० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आलाय. इलेक्ट्रॉनिक सामानांवरील कस्टम ड्युटीत बदल करण्यात आलाय. याशिवाय लेड, झिंकवर बेसिक कस्टम ड्युटी लागणार नाही.
01 Feb, 25 11:57 AM
कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय
मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅन्सरशिवाय महत्त्वाची ३६ औषधं स्वस्त होणार. याशिवाय लिथियम आयन बॅटरी बनवणाऱ्यांना दिलासा देण्यात आलाय.
01 Feb, 25 11:43 AM
इन्शुरन्स क्षेत्रात १०० टक्के एफडीआय -अर्थमंत्री
पुढील आठड्यात नवं इन्कम टॅक्स बिल सादर केलं जाणार. याशिवाय इन्शुरन्स क्षेत्रात १०० टक्के एफडीआय करण्यात आल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. तर दुसरीकडे पोस्ट पेमेंट बँकांची व्याप्ती ग्रामीण भागापर्यंत वाढवण्यात येणार आहे. सेट्रल केव्हायसी रजिस्ट्री बनवली जाील. रेग्युलेटरी रिफॉर्मसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली.
01 Feb, 25 11:52 AM
न्यूक्लिअर एनर्जीसाठी नवी स्कीम - अर्थमंत्री
न्यूक्लिअर एनर्जीसाठी नवी स्कीम आणणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. छोटे रिअॅक्टर्स बनवण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद. याशिवाय सरकारी दस्तऐवजांचं आधुनिकीकरण होणार. पुरातन हस्तलिखितांचं संवर्धन केलं जाणार.
01 Feb, 25 11:43 AM
Union Budget 2025: न्यूक्लिअर एनर्जीसाठी नवी स्कीम - अर्थमंत्री
न्यूक्लिअर एनर्जीसाठी नवी स्कीम आणणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. छोटे रिअॅक्टर्स बनवण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद. २०३३ पर्यंत ५ लोकल, स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर्स तयार केली जाणार. याशिवाय सरकारी दस्तऐवजांचं आधुनिकीकरण होणार. पुरातन हस्तलिखितांचं संवर्धन केलं जाणार.
01 Feb, 25 11:39 AM
राज्यांच्या पायाभूत सुविधांसाठी व्याजमुक्त रक्कम मिळणार - अर्थमंत्री
राज्यांच्या पायाभूत सुविधांसाठी व्याजमुक्त रक्कम मिळणार. १.५ लाख कोटींची रक्कम ५० वर्षांसाठी व्याजमुक्त असेल. याशिवाय शहरी विकासाठी १ लाख कोटी रुपयांचा फंड दिला जाणार. स्ट्रीट वेंडर्ससाठी युपीआय लिंक्ड कार्ड आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्याचं लिमिट ३० हजार रुपयांचं असेल.
01 Feb, 25 11:35 AM
मेरिटाईम बोर्डाची स्थापना होणार - अर्थमंत्री
गिग वर्कर्ससाठी सोशल सिक्युरिटी स्कीम सुरू होणार. त्यांच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स स्कीम आणली जाणार.ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर्कर्ससाठी सोशल सिक्युरिटी स्कीम आणली जाणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. याशिवाय २५ हजार कोटी रुपये खर्च करू मेरिटाईम बोर्डाची स्थापना केली जाणार असल्याचं त्या म्हणाल्या. अतिविशाल जहाजांचा या योजनेत समावेश होणार. उडान योजना नव्यानं स्थापन होणार. पुढील १० वर्षांत १२० ठिकाणं जोडली जाणार.
01 Feb, 25 11:32 AM
ग्रीन एनर्जी , ईव्ही तंत्रज्ञानाला चालना मिळणार : अर्थमंत्री
अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ग्रीन एनर्जी आणि ईव्ही तंत्रज्ञानाला अधिक प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. गुंतवणूक हे आपल्या सरकारचे तिसरं इंजिन आहे. याशिवाय सक्षम अंगणवाडी २.० कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. १ कोटी गरोदर आणि स्तनदा महिलांना याचा फायदा होणार आहे. भारत नेट प्रकल्पाद्वारे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सर्व सरकारी शाळा आणि सर्व ग्रामीण सरकारी रुग्णालयांमध्ये प्रदान केली जाईल.
01 Feb, 25 11:30 AM
आयआयटींची संख्या वाढवली जाणार
ग्रामीण प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये ब्रॉडबँडची सुविधा आणणार. याशिवाय आयआयटींची संख्या वाढवली जाणार. तर दुसरीकडे एआय सेंटर ऑफ एक्सिलंस सुरू केलं जाणार.
01 Feb, 25 11:28 AM
कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर करणार
बिहारमध्ये फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट इन्स्टिट्युट सुरू करणार. याशिवाय देशात एआयच्या अभ्यासाठी तीन केंद्र उभारली जाणार. कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर करणार. वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात १० हजार जागा वाढवल्या जाणार. ५ वर्षांमध्ये ७५ हजार जागा वाढवल्या जाणार. भारतीय भाषांमधील पुस्तकांना चालना देणार. सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० ची सुरूवात करणार.
01 Feb, 25 11:23 AM
खेळण्यांच्या क्षेत्रात भारताला ग्लोबल हब बनवणार
खेळण्यांच्या क्षेत्रात भारताला ग्लोबल हब बनवणार. याशिवाय लेदर स्कीमद्वारे २२ लाख नवे रोजगार निर्माण होणार. लेबर इंटेसिव्ह क्षेत्रासाठी प्रोत्साहन योजनांची घोषणा. फुटवेअर, लेदरसाठी नवी योजना येणार
01 Feb, 25 11:21 AM
छोट्या उत्पादकांना स्मार्ट क्रेडिट कार्ड मिळणार
इंडिया पोस्ट मोठी लॉजिस्टिक संस्था बनणार. याशिवाय अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठीही घोषणा करण्यात आली. एमएसएमईला सहज कर्ज उपलब्ध करून देणार. त्यांना २० कोटींपर्यंतचं क्रेडिट गॅरेंटी कव्हर मिळणार. छोट्या उत्पादकांना स्मार्ट क्रेडिट कार्ड मिळणार. याशिवाय चामड्याची पादत्राणं बनवणाऱ्यांसाठीही विशेष योजना आणण्यात आली.
01 Feb, 25 11:16 AM
किसान क्रेडिट कार्डावरील कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख
उत्तम प्रतीच्या कापूस उत्पादनासाठी योजना सुरू करणार. युरिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करणार. किसान क्रेडिट कार्डावरील कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
01 Feb, 25 11:13 AM
कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी पावलं उचलली जाणार
कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी पावलं उचलली जाणार. डाळींसाठी ६ वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजनेची घोषणा. केंद्राच्या एजन्सी पुढील ४ वर्षांत तूर, उदड आणि मसुर डाळ खरेदी करणार. बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
01 Feb, 25 11:09 AM
राज्यांसोबत पीएम कृषी धान्य योजना सुरू करणार
अर्थसंकल्पातून निर्यात वाढवण्याचे प्रयत्न करणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. राज्यांसोबत पीएम कृषी धान्य योजना सुरू करणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. योजनेंतर्गत १०० जिल्ह्यांना विशेष फायदा होणार आहे. याचा फायदा देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना होणार.
01 Feb, 25 11:07 AM
देश म्हणजे केवळ जमीन नाही, देश म्हणजे जनता - अर्थमंत्री
देश म्हणजे केवळ जमीन नाही, देश म्हणजे जनता. आमचा उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यावर भर, असल्याचं अर्थमंत्री आपल्या भाषणादरम्यान म्हणाल्या. जिओ पॉलिटिकल तणावादर्यान जागतिक विकासात मंदी. खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यास मदत करणार असल्याचं त्या म्हणाल्या.
01 Feb, 25 11:04 AM
अर्थसंकल्पादरम्यान विरोधकांचा गोंधळ
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास केली सुरूवात. अर्थसंकल्पादरम्यान विरोधकांचा गोंधळ
01 Feb, 25 10:56 AM
Union Budget 2025 : अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आता थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसेदेत अर्थसंकल्प मांडतील.
01 Feb, 25 10:43 AM
Union Budget 2025: अर्थसंकल्पापासून फार आशा नाही, पण.. - जयराम रमेश
"अर्थसंकल्पात हेतू आणि आशय दिसतो. हेतू आणि आशयच मर्यादा ठरवतो. आम्हाला फारशी आशा नाही. खासगी गुंतवणुकीसाठी जी पावलं उचलावी लागतील, ज्या सवलतींची गरज आहे, मला अर्थसंकल्पात एवढा मोठा धमाका अपेक्षित नाही. पण मध्यमवर्गाचं काय होणार पाहूया, करसवलती मिळणार की नाही, टॅक्स टेररसिजमपासून सुटका होईल का? जीएसटीमध्ये मूलभूत सुधारणांची गरज आहे. मोदी ३.० ची चर्चा आहे पण जीएसटी २.० कधी येणार?" असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला.
01 Feb, 25 10:39 AM
Union Budget 2025 : हितांचं रक्षण करण्यास सक्षम असल्याचा ऐतिहासिक विक्रमही त्या करतील -प्रियंका चतुर्वेदी
"मला आशा आहे की त्या (निर्मला सीतारामन) विक्रम करत असताना, देशातील नागरिकांच्या हितांचं रक्षण करण्यास सक्षम असल्याचा ऐतिहासिक विक्रमही त्या करतील. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समस्या थोड्या कमी होतील, या आशेनं आपण अर्थसंकल्पाकडे पाहतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली.
01 Feb, 25 10:30 AM
Union Budget 2025 Live: "हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असेल"
निश्चितरित्या हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. हा २०४७ च्या भारताच्या निर्मितीचा, विकसित भारताच्या निर्मितीचा अर्थसंकल्प असेल. हा सामान्यांच्या जिवनात बदल घडवणारा अर्थसंकल्प असेल, अशी प्रतिक्रिया छत्तीसगढचे उपमुख्यमंत्री अरुण साव यांनी दिली.
01 Feb, 25 10:27 AM
Union Budget 2025 Live: समजातील प्रत्येक घटकासाठीचा अर्थसंकल्प - राजनाथ सिंग
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे संसदेत पोहोचले. आज बजेट सादर होणार आहे. हे समाजातील प्रत्येक घटकासाठी असेल, असं ते म्हणाले.
01 Feb, 25 10:14 AM
Union Budget 2025 Live: राष्ट्रपतींच्या भेटीनंतर अर्थमंत्री संसदेत पोहोचल्या
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसद भवनात दाखल झाल्या. लवकरच संसद भवनात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.
01 Feb, 25 10:04 AM
Union Budget 2025 : अर्थसंकल्प सादर करण्यास मंजुरी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास मंजुरी दिली. निर्मला सीतारामन ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील.
01 Feb, 25 09:31 AM
Union Budget 2025 : शिक्षण क्षेत्रात होऊ शकतात या घोषणा
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन शिक्षण सेवांवरील जीएसटी दर कमी करण्याची शक्यता आहे. याशिवाय स्किल गॅप, व्होकल ट्रेनिंग प्लॅटफॉर्मचे बळकटीकरण, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षक प्रशिक्षणात सुधारणा आणि उच्च शिक्षण आणि संशोधन यासंदर्भात अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे.
01 Feb, 25 09:57 AM
Budget 2025 Live Updates: अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा नाही - संदीप दीक्षित
अर्थसंकल्पाकडून काही खास अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया नवी दिल्ली जागेवरील काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी दिली. भाजप गेल्या ८-१० वर्षांपासून अर्थसंकल्प सादर करत आहे, पण कोणत्याही अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही. आता दिल्लीत निवडणुका आहेत. दिल्लीत त्यांना काही मिळणार नाही याची खात्री आहे, यासाठीच दिल्लीच्या जनतेला करासारख्या काही आकर्षित करणाऱ्या घोषणा करू शकतात, असं ते म्हणाले.
01 Feb, 25 09:41 AM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ११ वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतली. अर्थमंत्री पारंपारिक पद्धतींऐवजी टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करतील.
01 Feb, 25 09:38 AM
Budget 2025 : अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजाराचा जोश हाय
अर्थसंकल्प २०२५ पूर्वीच गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. गेल्या चार ट्रेडिंग सेशनपासून बाजारात सातत्यानं तेजी पाहायला मिळत होती, मात्र आज १ फेब्रुवारीला बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स ८७७.२० अंकांनी वधारून ७७,६३७.०१ अंकांवर खुला झाला. निफ्टी ५० देखील २७९.१० अंकांच्या वाढीसह २३,५२८.६० वर व्यवहार करत आहे.
या तेजीचं कारण म्हणजे अर्थसंकल्पाविषयी बाजाराच्या अपेक्षा. सरकार अर्थव्यवस्था आणि कंपन्यांसाठी फायदेशीर ठरेल अशा घोषणा करेल, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. २०२५ चा अर्थसंकल्प बाजाराच्या अपेक्षेवर कसा खरा उतरतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागल आहे.
01 Feb, 25 09:26 AM
Budget 2025: Nominal GDP ९.८-१०.३% पर्यंत वाढू शकते - रिपोर्ट
२०२५ च्या आर्थिक पाहणी अहवालात भारताची रिअल जीडीपी ग्रोथ ६.३ ते ६.८ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता बँक ऑफ बडोदाच्या रिपोर्टनुसार पुढील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नॉमिनल जीडीपी ग्रोथ ९.८% वरून १०.३% पर्यंत असू शकते.
01 Feb, 25 09:12 AM
Union Budget 2025 Live Updates : निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयात पोहोचल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपल्या निवासस्थानाहून नॉर्थ ब्लॉक येथे पोहोचल्या आहेत. आज सलग आठव्यांदा त्या बजेट सादर करतील.
01 Feb, 25 09:19 AM
बजेट केवळ अकाऊंटिंग एक्सरसाईज - मनीष तिवारी
अर्थसंकल्पापूर्वी मनीष तिवारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी बजेट काय आहे? असं म्हणते ते एक अकाऊंटिंग एक्सरसाईज असल्याचं म्हटलंय.
01 Feb, 25 09:12 AM
अर्थसंकल्पापूर्वी पंकज चौधरी म्हणाले, थोडी वाट पाहा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता आपला ८ वा अर्थसंकल्प सादर करणरा आहेत. यापूर्वी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हे नॉर्थ ब्लॉकमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वकाही १२ वाजेपर्यंत तुमच्यासमोर असेल, थोडी वाट पाहा असं ते म्हणाले.
01 Feb, 25 08:52 AM
थोड्याच वेळात निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयात पोहोचणार
निर्मला सीतारामन थोड्याच वेळात अर्थमंत्रालयासाठी रवाना होणार आहेत. याच दरम्यान अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी अर्थमंत्रालयात पोहोचले आहेत आहेत. तर मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरनही अर्थमंत्रालयात पोहोचलेत.
01 Feb, 25 08:42 AM
२०१७ पासून बदलली रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा
संरक्षण, शिक्षण आणि आरोग्य तसंच भारतीय रेल्वेशी संबंधित महत्त्वाच्या घोषणाही अर्थसंकल्पात केल्या जाणार आहेत. मोदी सरकारनं आपल्या कार्यकाळात रेल्वे अर्थसंकल्पासह अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक जुन्या परंपरा बदलल्या आहेत. २०१७ पूर्वी भारतीय रेल्वेसाठी स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता.
01 Feb, 25 08:24 AM
अर्थसंकल्पाच्या दिवशी सिलिंडर स्वस्त
आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला जाणार असून त्यापूर्वीच एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले आहेत. इंधन कंपन्यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. या सिलिंडरची किंमत ७ रुपयांनी कमी करण्यात आली असून त्यानंतर राजधानी दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडर अर्थसंकल्पाच्या दिवसापासून १८०४ रुपयांवरून १७९७ रुपये करण्यात आला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
01 Feb, 25 08:33 AM
बजेट केवळ अकाऊंटिंग एक्सरसाईज - मनीष तिवारी
अर्थसंकल्पापूर्वी मनीष तिवारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी बजेट काय आहे? असं म्हणते ते एक अकाऊंटिंग एक्सरसाईज असल्याचं म्हटलंय.