Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PF Withdrawal : बजेटमध्ये सरकारनं PF मधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदलले, आता कापला जाणार एवढा TDS

PF Withdrawal : बजेटमध्ये सरकारनं PF मधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदलले, आता कापला जाणार एवढा TDS

यावेळी बजेटमध्ये पीएफ (PF) संदर्भातही मोदी सरकारकडून महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या घोषणांमुळे कोट्यवधी लोकांना फायदाही होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:07 PM2023-02-02T14:07:07+5:302023-02-02T14:07:45+5:30

यावेळी बजेटमध्ये पीएफ (PF) संदर्भातही मोदी सरकारकडून महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या घोषणांमुळे कोट्यवधी लोकांना फायदाही होणार आहे.

union budget nirmala sitharaman tds rate on epf withdrawals reduced to 20 percent | PF Withdrawal : बजेटमध्ये सरकारनं PF मधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदलले, आता कापला जाणार एवढा TDS

PF Withdrawal : बजेटमध्ये सरकारनं PF मधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदलले, आता कापला जाणार एवढा TDS

मोदी सरकारच्या वतीने बजेट 2023 मध्ये अनेक मोठ-मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात विविध वर्गातील लोकांना डोळ्यासमोर ठेवऊन घोषणा करण्यात आल्या आहेत. याच बरोबर यावेळी बजेटमध्ये पीएफ (PF) संदर्भातही मोदी सरकारकडून महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या घोषणांमुळे कोट्यवधी लोकांना फायदाही होणार आहे.

बजट 2023 -
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यात विविध प्रकारच्या घोषणाही करण्यात आल्या आहेत. यावेळी भविष्य निर्वाह निधी (PF) संदर्भात करण्यात आलेल्या घोषणेमुळे जे लोक पीएफ अकाउंटमधून पैसे काढणार आहेत त्यांनाही लाभ होईल.

टीडीएस रेट -
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बजेट भाषणानुसार, पूर्वी ईपीएफमधून पैसे काढण्यासाठी 30 टक्के एवढा टीडीएस द्यावा लागत होता. मात्र, आता सरकारकडून तो कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. आता सरकारकडून ईपीएफमधून withdrawl केल्यानंतर 20 टक्के टीडीएसचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ईपीएफमधून पैसे काढल्यानंतर, आता लोकांना केवळ 20 टक्केच टीडीएस द्यावा लागेल.

पीएफ काढणे -
ईपीएफमधून पैसे काढताना लागणारा टीडीएस कमी केल्याने लोकांना मोठा फायदा होईल. ईपीएफमधून पैसे काढण्यासाठी लागणारा टीडीएस कमी केल्याने अशा लोकांना लाभ होईल ज्यांचा पॅन क्रमांक ईपीएफओमध्ये रेकॉर्डसह अपडेट नाही. तसेच पॅन कार्ड नसलेल्या लोकांसाठी पीएफ काढण्यावर कमाल किरकोळ दराने कर कापण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. यामुळे कमी उत्पन्न असलेल्या स्लॅबमध्ये असलेल्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. आता असे लोक 20% वर टीडीएसच्या आधीन असतील. तसेच नवा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल.

ईपीएफ -
सध्याच्या आयकर कायद्यानुसार, ईपीएफ खाते उघडल्यानंतर 5 वर्षांच्या आत पैसे काढल्यास टीडीएस कापला जातो. जर ईपीएफओकडे पॅन उपलब्ध असेल तर काढण्यात येणारी रक्कम 50,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर 10% दराने टीडीएस कापला जातो. मात्र, पॅन उपलब्ध नसेल तर 30% टीडीएस कापला जातो.

 

Web Title: union budget nirmala sitharaman tds rate on epf withdrawals reduced to 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.