अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. परंतु यावेळी करदात्यांची मात्र निराशा झाली. यावर्षी कररचना जैसे थे ठेवण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यावेळी अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीय आणि सॅलरीड क्लासला मोठा झटका दिला आहे. यावेळी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले जातील अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र यावेळीही करदात्यांची निराशाच झाली. यावर्षी सरकारनं इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे ठेवले आहेत. यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये अखेरचे बदल २०१४ मध्ये करण्यात आले होते.
Union Finance Minister Nirmala Sitharaman introduces Finance Bill 2022. #BudgetSession2022pic.twitter.com/LwWRR5DEQS
— ANI (@ANI) February 1, 2022
काय आहेत सध्याचे स्लॅब?
सध्याच्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये २.५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. तर २.५ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर ५ टक्के कर आकारला जातो. परंतु यात ८७ ए मध्ये रिबेटही मिळतो. याशिवाय ३ ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर आकारला जातो. यामध्ये ८७ ए मध्ये रिबेट मिळतो. ५ ते ७.५ लाखांपर्यंत उत्पन्नावर १० टक्के कर आकारला जातो. तर ७.५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर द्यावा लागतो. तर १० लाखांपासून १२.५० लाखांपर्यंत २० टक्के आणि १२.५० लाख ते १५ लाखांपर्यंत २५ टक्के कर आकारला जातो. १५ लाखांच्या वर उत्पन्न असल्यास त्यावर ३० टक्के कर आकारतात.