नवी दिल्ली - देशात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. देशातील अनेक शहरांत पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. पेट्रोलियम कंपन्या सातत्याने पेट्रेलचे दर वाढवत आहेत. जनता वाढत्या इंधन दरामुळे बेहाल आहे. असे असतानाच, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून सध्या मुक्ती मिळणार नाही, असे संकेत पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.
गुजरात दोऱ्यावर असलेल्या केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना, पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती कमी होणार का? असा प्रश्न केला असात, सध्या सरकारचे उत्पन्न अत्यंत कमी झाले आहे आणि खर्च वाढला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान उत्पन्न कमी होते आणि हे उत्पन्न 2021-22 मध्येही कमीच राहील, असे ते म्हणाले.
प्रधान म्हणाले, आरोग्य क्षेत्रातील सरकारचा खर्च वाढला आहे. वेलफेअर अॅक्टिव्हिटीजमध्येही सरकार खर्च करत आहे. वाढता खर्च आणि कमी झालेले उत्पन्न पाहता, डिझेल-पेट्रोलचे दर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही. अर्थात, डिझेल आणि पेट्रोलचे दर सध्या कमी होणार नाही, असे पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी इंधनाच्या वाढत्या दराचे कारणही सांगितले.
इंधन होरपळ ! गेल्या २० वर्षांत पेट्रोल-डिझेल तब्बल ७१ रुपयांनी महागले
पेट्रोलियम मंत्री प्रधान म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर 70 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. म्हणून डीझेल आणि पेट्रोलची किंमत वाढत आहे.
7 जून म्हणजे आजही पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवले. दिल्लीत डिझेल 27 पैसे प्रति लिटर तर पेट्रोलचा 28 पैसे प्रति लिटर दराने महाग झाले. 6 जूनला पेट्रोल 27 पैसे तर डिझेल 29 पैसे प्रति लिटर वाढले होते. मुंबईत पेट्रोल 101.52 आणि डिझेल 93.98 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.