Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘त्या’ गव्हर्नरास बडतर्फ करण्यास सांगितले होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट

‘त्या’ गव्हर्नरास बडतर्फ करण्यास सांगितले होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट

रिझर्व्ह बँकेच्या एका गव्हर्नरास तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस आपण तत्कालीन वित्तमंत्र्यांकडे केली होती, असे वक्तव्य केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:05 AM2019-08-13T03:05:28+5:302019-08-13T03:05:55+5:30

रिझर्व्ह बँकेच्या एका गव्हर्नरास तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस आपण तत्कालीन वित्तमंत्र्यांकडे केली होती, असे वक्तव्य केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

Union minister Nitin Gadkari was asked to dismiss 'that' governor | ‘त्या’ गव्हर्नरास बडतर्फ करण्यास सांगितले होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट

‘त्या’ गव्हर्नरास बडतर्फ करण्यास सांगितले होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट

नागपूर : रिझर्व्ह बँकेच्या एका गव्हर्नरास तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस आपण तत्कालीन वित्तमंत्र्यांकडे केली होती, असे वक्तव्य केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर किती अडेलतट्टू भूमिका घेतात तसेच त्यांच्या भूमिकेमुळे अर्थव्यवस्थेवर कसा प्रतिकूल परिणाम होतो, हे सांगताना गडकरी यांनी रविवारी नागपूरमधील दोन वेगवेगळ्या समारंभात ही माहिती दिली. त्यांनी संबंधित गव्हर्नर आणि वित्तमंत्र्यांचे नाव मात्र सांगितले नाही. ‘हा गव्हर्नर चांगला नाही. त्याला तात्काळ बडतर्फ केले पाहिजे’, असे आपण वित्तमंत्र्यांना सांगितले होते, असे गडकरी म्हणाले.

रालोआच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटली आणि पीयूष गोयल हे वित्तमंत्री होते. त्या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद रघुराम राजन आणि ऊर्जित पटेल यांनी सांभाळले. राजन यांना दुसरा कार्यकाळ मिळाला नाही; तर पटेल यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. यापैकी कोणाचेही नाव गडकरी यांनी घेतले नाही. त्यांनी केवळ ‘वित्तमंत्री’ आणि ‘रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर’ असाच मोघम उल्लेख केला.

दास यांच्याकडून मोठ्या अपेक्षा

गडकरी यांनी म्हटले की, गव्हर्नरांचे मन वळविण्याचा मी खूप प्रयत्न केला. तथापि, ते अडून राहिले. नंतर वित्तमंत्र्यांनी मला सांगितले की, त्यांनी (गव्हर्नर) राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. मात्र त्यांनी तसे केलेले नाही. त्यावर मी वित्तमंत्र्यांना सांगितले की, ते स्वत: जाणार नसतील तर त्यांना हाकलून लावणे योग्य राहील. ते चांगले नाहीत.’ रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून बँकिंग क्षेत्र सकारात्मक भूमिकेची अपेक्षा करू शकते, असेही गडकरी म्हणाले.

Web Title: Union minister Nitin Gadkari was asked to dismiss 'that' governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.